विक्रोळी पार्कसाईट येथील शिवगर्जना सोसायटी मधील शेडची भिंत कोसळली ; मनपा एन विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा प्रविण धुमाळ यांचा आरोप !!
घाटकोपर, (केतन भोज) : सततच्या मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विक्रोळी पार्कसाईट प्रभाग क्रमांक १२३ मधील राहुल नगर ब मधील शिवगर्जना सोसायटी मधील शेडची भिंत गुरुवार (ता.१९) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोसळली, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या शेडच्या भिंतीच्या बांधकामासाठी संबंधित महापालिका एन विभागाकडे गेली दोन वर्षे तक्रार करूनही तसेच वारंवार याबाबत पाठपुरावा करून देखील संबंधित मनपा एन विभागाच्या अधिकारी यांनी दखल घेतली नाही. असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ यांनी केला आहे. तसेच मनपा एन विभाग प्रभाग क्रमांक १२३ चे जबाबदार अधिकारी प्रकाश बोरनारे-कनिष्ठ अभियंता (स्था.) यांनी या शेडच्या भिंतीची पाहाणी करूनही या भिंतीचे बांधकाम करण्यात आले नाही असा सुद्धा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ यांनी केला आहे.
तसेच शेडची भिंत पडल्याचे समजताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ हे तत्काळ जागेवर उपस्थित राहून याची कल्पना संबंधित महापालिका एन विभाग यांना दिली व तत्काळ मनपा एन विभागाच्या कर्मचारी यांच्याकडून येथील पडलेल्या शेडच्या भिंतीचा मलबा साफ करून घेतला.
तरी याठिकाणी काही जीवितहानी झाली असती,तर याची जबाबदारी महापालिका एन विभागाचे अधिकारी यांनी घेतली असती का असा सवाल ही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment