उद्योग जगतातील एक प्रथितयश नाव महादानवीर व्यक्तिमत्त्व तरूणांचे प्रेरणास्थान सुशांतजी नामदेव मोरे !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्यातील नामवंत मराठी प्रतिष्ठित उद्योजकांच्या नामावली मधील एक यशस्वी मराठमोळे तरुण तडफदार उद्योजक, महा दान वीर, दानशूर व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यकर्ते, अनाथ पिंडक गौरव पुरस्कार, चक्रवर्ती सम्राट अशोक गौरव पुरस्कार प्राप्त, सुश्रद्धा सोशल वेलफेअर फाऊंडेशन व मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, माणगांव आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेंचे फायनान्शियल सपोटर, तरुणांचे प्रेरणास्थान, आंबेडकरी बौद्ध धम्म चळवळीतील अग्रदूत धम्म प्रिय समाज वत्सल भिम सैनिक आयु. मा. सुशांत जी नामदेव मोरे साहेब यांचे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनमोल आणि अविस्मरणीय असे योगदान दडलेले आहे.
सुशांत जी मोरे साहेब यांनी आपल्या जीवनात निरंतर खडतर असा संघर्ष केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी अविरतपणे अहर्निश कष्ट करून यशस्वीतेचे उच्चतम शिखर पादाक्रांत करून यश सिद्धी प्राप्त केली आहे. अतिशय कमी वयात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या सुशांत मोरे यांना आपल्या श्रीमंतीचा जराही गर्व नाही. ते नेहमीच लहान मोठ्या आणि वयोवृद्ध नागरिकांशी अत्यंत नम्र आणि सौजन्याने वागतात.
सामाजिक क्षेत्रात वावरत असताना ते नेहमीच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा या उपक्रमास ते निष्पक्ष पणे सढळ हस्ते मदत करत असतात. त्यामुळे सुशांत जी मोरे साहेब यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा आहे. गोरगरीब जनतेच्या सुखा दुःखात ते नेहमी तत्परतेने धावून जातात. गोरगरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन ते नेहमीच मदतीचा हात पुढे करतात.
रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यात आजवर झालेल्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेस त्यांचे व्यक्तिगत स्वरूपात अनमोल असे योगदान लाभले आहे, त्यांनी माणगांव येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेस दरवर्षी सढळ हस्ते भरीव मदत केली आहे. असे महा दान वीर, दानशूर कट्टर भिम सैनिक म्हणून बौद्ध समाजाला सुशांत जी मोरे साहेब यांच्या रुपाने लाभले आहे.
गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी मा. सुशांत जी मोरे साहेब यांचा वाढदिवस माणगांव शहरात विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रमाने साजरा होणार आहे. त्यामुळे मा. सुशांत जी नामदेव मोरे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड आणि सह परिवार बोरघर, माणगांव यांच्या वतीने उदंड व निरोगी दीर्घ आयुष्याच्या लाख लाख मंगल कामना व मंगलमय शुभेच्छा.
No comments:
Post a Comment