Wednesday, 18 June 2025

कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपिका आग्रे तर सरचिटणीस पदी प्रतीक्षा कालप-निवाते, सह चिटणीस पदी सौ.अश्विनी बाईत यांची निवड !!

कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपिका आग्रे तर सरचिटणीस पदी प्रतीक्षा कालप-निवाते, सह चिटणीस पदी सौ.अश्विनी बाईत यांची निवड !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी महिला मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन महिला कार्यकारणी पदाधिकारी निवड कुणबी ज्ञाती गृह, (वाघे हॉल) परेल मुंबई येथे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
         या सभेला सरचिटणीस कृष्णा वणे यांनी निवड प्रक्रियेची सुरुवात केली. यावेळी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सुवर्णा पाटील सेक्रेटरी दिपिका आग्रे उपस्थित होत्या. कोकण विभागातील सात जिल्ह्यात गेली १०५ वर्ष संघटना कार्यरत असून विविध तालुका तसेच विभागीय शाखेतून महिला प्रतिनिधी पाठविण्यात आले होते. यातून प्रथम ५१ कार्यकारणी सदस्य निवडण्यात आले. उर्वरित महिला सदस्य प्रतिनिधी म्हणून राहतील असे सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सांगितले. 

       कुणबी महिला मंडळ कार्यकारिणी सन-२०२४-२५ ते २०२८-२९ पुढील प्रमाणे निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षा म्हणून सौ. दिपिका संदीप आग्रे (ता. चिपळूण) यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षा म्हणून सौ.सुहासिनी गोणबरे (गुहागर), उपाध्यक्ष सौ.स्मिता गोंधळी (संगमेश्वर), सौ. करुणा पाटील (शहापूर), सौ.स्नेहा खापरे (म्हसळा) यांची निवड झाली. महत्वाच्या अशा सरचिटणीस पदी युवा नेतृत्व सौ.प्रतीक्षा निवाते (तळा) यांची निवड करण्यात आली. तसेच चार सहचिटणीस म्हणून सौ.स्वप्ना गोरीवले (गुहागर), सौ. संजना भोईर- (ठाणे ग्रामीण), सौ.दिपीका मौले (महाड पोलादपूर), सौ.अश्विनी बाईत (विक्रोळी) यांची निवड झाली आहे.
       सौ.अश्विनी बाईत या विक्रोळी-घाटकोपर विभागीय शाखेच्या महिला अध्यक्षा आहेत. त्यांनी महिलांना एकत्र करत शाखेतर्फे विविध उपक्रम घेऊन यशस्वी केले आहेत. त्यांची निवड होताच विक्रोळी-घाटकोपर शाखा पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, महिला कार्यकारणी, विवाह मंडळ कार्यकारणी, युवा पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, सल्लागार कमिटी, प्रसिद्धी प्रमुख यांनी सौ. अश्विनी आत्माराम बाईत यांना अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या.
       रायगड मधील रोहा तालुक्यातील खजिनदार: कु.निलाक्षी दामोदर लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी कुणबी संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, उदय कटे, सहसचिव माधव कांबळे, संजय उमासरे, रवींद्र कुडतरकर, खजिनदार महेश शिर्के उपस्थित होते. महिला मंडळाने यापूर्वी देखील बरेचसे सामाजिक तथा महिला एकीकरण बाबत उपक्रम राबवले आहेत तरी देखील बदलत्या काळात समाजिक प्रश्न, जनजागृती, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीयदृष्ट्या महिला सक्षमीकरण यावर अधिक भर द्यावा असे मत व्यक्त करण्यात आले. शेवटी सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सर्वांचे आभार मानून सभेचा समारोप केला.

No comments:

Post a Comment

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !! वाडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा र...