Thursday, 19 June 2025

राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांच्यामुळे टोल युनिटच्या समस्या, प्रश्न मार्गी !!

राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांच्यामुळे टोल युनिटच्या समस्या, प्रश्न मार्गी !!

मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

            शुक्रवार (१३ जून) पासुन ६ दिवस mep टोल कामगार यांनी आपल्या हक्कासाठी काम बंद आंदोलन केले. आंदोलन केले म्हणून आज मालकांनी टोल कमेटी मेंबर आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर याच्याबरोबर एक महत्वपूर्ण मिटिंग घेतली. या बैठकीत कामगारांचे महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. आज हे फक्त कामगारांची एक जूट आणि श्री. पावसकर साहेबांचा कामगार यांना असलेला सपोर्ट यामुळेच शक्य होऊ शकले. आज टोल कामगार याच्यावर २० वर्षापासुन जो अन्याय होत होता, तो आता कुठे तरी यनिमित्ताने थांबला आहे. असेच प्रश्न वेगवेगळ्या कामगारांचे आहेत हे सर्वं प्रश्न फक्त राष्ट्रीय कर्मचारी सेना सोडू शकते. कारण तेथे पावसकर साहेब याचे नेतृत्व आहे. राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि श्री. किरण पावसकर साहेब याचे यानिमित्ताने कामगार वर्गाकडून आभारी असल्याचे मत व्यक्त करत श्री. पावसकर यांना राष्ट्रीय कर्मचारी सेना टोल युनिट अध्यक्ष श्री.शरद गोंधळे आणि कर्मचारी यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !! *** श्री.संजय दत्तात्रय भालेर...