Thursday, 19 June 2025

घाटकोपर मनपा एन विभागातील प्रभाग क्र.१२७ मधील रामनगर अ मधील वस्ती स्वच्छता योजना फक्त नावापुरती ; वस्ती स्वच्छता योजनेचा निधी ठेकेदाराच्या खिशात !!

घाटकोपर मनपा एन विभागातील प्रभाग क्र.१२७ मधील रामनगर अ मधील वस्ती स्वच्छता योजना फक्त नावापुरती ; वस्ती स्वच्छता योजनेचा निधी ठेकेदाराच्या खिशात !!

घाटकोपर, (केतन भोज) ::मुंबई महानगरपालिकेची ‘वस्ती स्वच्छता योजना’ असतानाही घाटकोपर पश्चिम प्रभाग क्रमांक १२७ मधील रामनगर (अ) मध्ये दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे काम न करणाऱ्या संस्थांच्या पाठीवर मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची मात्र शाबासकीची थाप मिळत आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. मुंबई महापालिकेच्या ‘वस्ती स्वच्छता योजने’च्या नावाखाली स्वच्छतेची थातूरमातूर देखाव्यापुरती कामे करून या योजनेतून मिळणारा मलिदा लाटण्याच्या प्रकारामुळे घाटकोपर पश्चिम प्रभाग क्रमांक १२७ मधील रामनगर (अ) येथील परिसरात घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य वाढले आहे. आश्चर्य म्हणजे आपल्या भागात स्वच्छताच होत नसल्याची येथील रहिवाशांची तक्रार असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या भागात वस्ती स्वच्छता योजनेअंतर्गत उत्तम काम होत असल्याचा शेरा देत ही योजना राबविणाऱ्या संस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. झोपडपट्टीत साफसफाई, घराघरांतून कचऱ्याचे संकलन, छोटी गटारे, आदींची स्वच्छता करण्याकरिता पालिकेतर्फे ही योजना राबविली जाते. यात प्रत्येक १० हजार घरांमागे एका संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते. सामाजिक किंवा त्या-त्या भागात काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या वस्तीच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घ्यावा या हेतूने हे योजना राबविली जाते. त्यात प्रत्येक सफाई कामगाराला ७ हजार रुपये इतके वेतन पालिका अदा करते आणि दत्तक वस्ती स्वच्छता योजना चालवणाऱ्या संस्थेला पालिका एकूण ५० हजार इतके दरमहा वेतन देते. १० हजार कुटुंबाच्या वस्तीकरिता १४ व्यक्तींची नियुक्ती करून संस्थांनी वस्तीच्या स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यावी, असे या योजनेत अपेक्षित आहे आहे. मात्र गंभीर म्हणजे १४ कामगारांऐवजी तीन किंवा चारच कामगार नेमून त्यांच्याकडून संपूर्ण वस्तीच्या स्वच्छतेचे काम उरकले जाते. उरलेले कामगार केवळ कागदावर दाखवून त्यांच्या वेतनाची रक्कम ठेकेदाराने खिशात टाकायची असा सगळा उद्योग सुरू प्रभाग क्रमांक १२७ मधील रामनगर (अ) मध्ये सुरू आहे. यामुळे वस्तीत स्वच्छतेची कामे होत नसल्याने कित्येक ठिकाणी ही योजना कागदावरच आहे. तरीही मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अशा संस्थांच्या कामाचे कौतुकच करत आहे. रामनगर (अ) विभागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. येथील संपूर्ण विभाग हा झोपडपट्टीचा आहे. परंतु कमी कामगार नेमून काम भागवून नेण्याच्या संस्थांच्या गैरप्रकारांमुळे या भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. त्यामुळे जागोजागी छोटी गटारे आजही तुंबडलेल्या स्थितीत असून सर्व कचरा व नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याचा परिणाम येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत असून, विभागात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. येथील रहिवाशांना स्वच्छतेअभावी या सर्व त्रासाला तोंड द्यावे लागत असताना काम करणाऱ्या संस्थांना मात्र प्रशस्तिपत्रक दिले जात आहे, याबद्दल येथील स्थानिक रहिवाशी यांनी संताप व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...