कै. बायमा नामदेव शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना छत्री वाटप !!
उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) :
कै. बायमा नामदेव शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेठ पाटील यांच्या तर्फे रा. जि. प. शाळा बेलपाडा येथील विद्यार्थ्यांना छत्री वाटपचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. छत्री मिळाल्याने सर्व विद्यार्थी आनंदीत होते.सामाजिक कार्यकर्ते तथा मधुकरशेठ पाटील हे सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना सढळ हाताने, निस्वार्थीपणाने मदत केली आहे. कै. बायमा नामदेव शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करून त्यांनी सर्वांचा आनंद द्विगुणित केला आहे. या कार्यक्रम प्रसंगी सुरेश पाटील (राष्ट्रीय महामंत्री भारतीय मजदूर संघ), सुधीर घरत (राष्ट्रीय खजिनदार भारतीय मजदूर संघ), अतिश पाटील (सचिव रायगड जिल्हा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना), तुकाराम ठाकूर (माजी सरपंच), कर्णिक पाटील (सचिव ग्राम सुधारणा मंडळ बेलपाडा), प्रकाश कडू (समाजसेवक ), अरुण घरत, अशोक घरत, संतोष भ. म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment