Sunday, 24 August 2025

"संगीत सन्यस्त खडग" हा नाटकाचा प्रयोग वंचित बहुजन आघाडी (कल्याण डोंबिवली जिल्हा) व सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या विरोधामुळे रद्द !!

"संगीत सन्यस्त खडग" हा नाटकाचा प्रयोग वंचित बहुजन आघाडी (कल्याण डोंबिवली जिल्हा) व सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या विरोधामुळे रद्द !!

कल्याण, संदीप कदम : सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित नाट्यसंपदा कला मंच सहनिर्मित माफीवर सावरकर लिखित "संगीत सन्यस्त खडग" हया नाटकाचा आचार्य अत्रे या नाट्यगृह ठिकाणी दिनांक 23/08/2025 रोजी नाट्य प्रयोग होणार होता परंतु या नाटकांमध्ये तथागत भगवान बुद्धांबद्दल अनेक आक्षेपार्ह उल्लेख व कथन करण्यात येत असल्याने हया नाटकाचा संपूर्ण महाराष्ट्रात विरोध असताना हे नाटक कल्याण नगरी मधे दाखवू नये जेणे करून सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती कल्याण डोंबिवली विभागात निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी चे कल्याण डोंबिवली अध्यक्ष विशाल पावशे व जिल्हा महासचिव गौतम गवई व कार्यकारणी च्या वतीने स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्यात हा नाट्यप्रयोग रद्द करण्याची मागणी करण्यात आली, तसेच सर्व आंबेडकरी विचारधारा असलेल्या सर्व संघटना, पक्ष ह्यांनी नाटकाच्या आयोजक मंडळातील काही लोकांसोबत स्थानिक पोलीस स्टेशन मधे चर्चा केली, त्यानुसार त्यांना हे नाटकात किती आक्षेपार्ह उल्लेख व वाक्य आहेत व त्याचा समाजात काय रोष निर्माण होईल ते समजून सांगितले, या सकारात्मक चर्चा परिणामी आयोजक आणि पोलीस प्रशासन यांनी ही हया सर्व भावनांचा आदर करून हा विवादित विषय होईल त्यामुळे नाटकाचा 23/08/2025 रोजीचा 8:30 चा प्रयोग रद्द करण्यात आला.

यावेळी कल्याण डोंबिवली मधील संपूर्ण जिल्ह्यातील आजी माजी सर्व  पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती व निषेध व्यक्त करून हया वादग्रस्त नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची भूमिका यशस्वी रीत्या पार पाडली यावेळी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विशालजी पावशे व जिल्हा महासचिव जी.ऐन  गवई आणि युवा नेत्या अश्विनीताई धुमाळ यांनी पक्षाच्या वतीने हा नाट्य प्रयोग रद्द झाल्यावर आपले मत व्यक्त केले. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत वाघचौरे , विनोद तिवारी , जिल्हा सचिव नितीन वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय सुरडकर, जिल्हा संघटक संदीप कदम, अमोल पंडित, राहुल जाधव, जिल्हा सचिव विलास कांबळे, सम्यकचे कमलेश उबाळे, रोहित डोळस, राजू खरात जिल्यातील जेष्ठ कार्यकर्ते अमर भारित साहेब, सुनील कांबळे साहेब, सुनील पगारे साहेब, उल्हास नगर अध्यक्ष शेशेराव वाघमारे, अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड, महिला कार्यकर्त्या सुरेखताई जाधव, सुषमाताई  निर्भुवने, कल्याण शहर पश्चीमचे संतोष गायकवाड, नितीन गायकवाड, युवराज साळवे व असंख्य महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...