Saturday, 23 August 2025

मुरबाडमध्ये बांधकाम विभागाचा कारनामा... "निधी हडप, रस्ता गडप" !!

मुरबाडमध्ये बांधकाम विभागाचा कारनामा... "निधी हडप, रस्ता गडप" !!

** अखेर खोपिवली रस्त्यासाठी आंदोलनाचा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष एस्. एल्. पाटील यांचा इशारा 

मुरबाड, प्रतिनिधी :
       "खोपिवली गाव अंतर्गत रस्ता सुधारणा करणे" या कामासाठी ठाणे जि. प. कडून रु. ९, ९१, ६४७ लाखाचा कार्यारंभादेश मे. राहुल भास्कर बांगर (सुबेअ) यांचे नावे दिला. यातून अंदाजपत्रकातील (जीपीएस) तरतुदीनुसार, श्री. कचरू भांडे ते शिवराम शिंदे यांच्या घरापर्यंतचा नादुरुस्त रस्ता चकाचक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरडे - सासे या जोड-गोळीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रस्तुत रस्ता दुरुस्तीः सुधारण्याआधीच "निधी हडप, रस्ता गडप" झाला. त्यामुळे सोलिंग, एमटेन, पीसीसी, वेडिंग कोट, एमट्वेंटी, या अंदाजपत्रकातील तरतुदीची अपेक्षा कामाच्या दर्जोन्नतीत करणे, हे चक्क मूर्खपणाचे ठरले आहे. या रस्त्यातील कामाच्या अपहाराबाबतची वस्तूस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील यांनी उपअभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून देऊनही रस्त्या सुधारणेचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. त्यामुळे शेवटी याबाबत "प्रहार" च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून प्रस्तुत रस्ता डी. एल. पी. नुसार ठेकेदार श्री. राहुल बांगर (भुवनपाडा) यांच्याकडून दुरुस्ती व पुनर्बांधणी करून खोपिवलीकरांना  सु:स्थितीत व निर्धारित वेळेत रस्ता वापरास मिळावा, अन्यथा ८ सप्टेंबर २०२५ रोजी स. ठीक ११.०० वा. उपअभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने "धरणे आंदोलन"  छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील यांनी दिल्याने संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...