प्रसूती रुग्णालय उल्हासनगर (सेक्टर 4) येथील डॉक्टरांनी वाचवले आईसह बाळाचे प्राण !!
उल्हासनगर, (शरद घुडे) : उल्हासनगर (सेक्टर 4) येथील शासकीय प्रसूती गृहात (रुग्णालयात) आईसह बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर चार येथील बत्तीस वर्षीय गरोदर माता अनिता यांना सोळा ऑगस्ट रोजी पोटदुखीमुळे वेदना व्हायला लागल्या, त्यांच्या कुटुंबाने तात्काळ उल्हासनगर चार येथील प्रसूती रुग्णालयात त्यांना दाखल केले. अनिताची ही पहिली गर्भधारणा होती, आणि तिची प्रसूतीची वेळही पूर्ण झाली नव्हती. अनिताच्या ओटीपोटात तीव्र वेदना होऊन उलट्या सुरु झाल्या, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे यांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचे ठरविले. काही चाचण्या केल्या नंतर अनिताच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये तीन वळणे पडून डिंबग्रंथीमध्ये गँग्रीन झाल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे आई आणि बाळाच्या जीवितास धोका असल्याची संभावना होती.
रुग्णालयाच्या डॉ.सुनीता जगताप आणि डॉ. कासम दलवाई यांनी भुलतज्ञ डॉ. रमेश सिंग तसेच रवी ब्रदर्स यांच्या मदतीने ३६ आठवड्याच्या गर्भवती असलेल्या अनिताची यशस्वी रीत्या शास्रक्रिया करून तब्बल ५.९×३.८ सेमी ची गाठ बाहेर काढली. दीर्घ काळ चाललेल्या या चॅलेजिंग ऑपरेशन ने देवदूत ठरलेल्या अनिता आणि तिच्या बाळाला वाचवण्यात यश आल्यामुळे तिच्या कुटुंबाने डोळ्यात अश्रू आणून आभार मानले.
सलाम आहे डॉक्टरांच्या या कार्याला,
ReplyDeleteजनसेवेचे बांधून कंकण. असे डाॅ. देवदूतच आहेत. परमेश्वर तुम्हाला असेच यश देत राहो. उदंड आयुष्य देवो. हीच प्रार्थना.अभिनंदन 🌹🌹🙏🏻
ReplyDelete