वसई विरार महानगरपालिकेच्या विकासकामांची थर्ड पार्टी तपासणी बंधनकारक; महापालिकेच्या भ्रष्टाचारावर बसणार आळा....
*शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या मागणीला यश....*
वसई विरार ता, ७ : वसई विरार महापालिकेच्या विकासकामांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतिने महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी आक्रमक होत मागणी केली आहे.अनेक विकासकामात भ्रष्टाचार होत असल्याने त्यानुसार पाच लाखांपुढील प्रत्येक विकासकामांची थर्ड पार्टीकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात यावी. याशिवाय एकूण कामांच्या दहा टक्के कामांची दक्षतामार्फतही प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विकासकामांमधील गोलमाल प्रकरणांना आळा बसण्यात मदत होणार आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांमार्फत होणार्या पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या विकासकामांची थर्ड पार्टी गुणवत्तातपासणी बंधनकारक करावी त्यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांची नेमणूक करून कंपनीकडून तपासणी बंधनकारक करण्याची मागणी रूचिता नाईक यांनी केली आहे.
अनेकदा संबंधित क्षेत्रीय आयुक्त अथवा खातेप्रमुख या कंपनीमार्फत तपासणी न करता अन्य कंपन्यांकडून तपासणी करून घेत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे विकासकामांमधील गुणवत्तेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तसेच अशा कामांमध्ये गैरव्यवहारांचे प्रकार घडत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची गंभीर दखल घेण्यात येत नसल्याने देखभाल दुरुस्तीची कामे नविन विकासकामे पाच लाखांवरील प्रत्येक विकासकामाच्या गुणत्तेची तपासणी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यासंस्थेमार्फत करणे बंधनकारक करण्याची मागणी महापालिका बांधकाम शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या वतिने रूचिता नाईक यांनी केली आहे.
यावेळी अल्पना सोनवणे, संजिवनी दळवी, विभाग संघटक जया गुप्ता, तृप्ती रामपुरे, शाखा संघटक वंदना ढगे, संगिता रॉड्रिग्ज, उपशहरप्रमुख महेश निकम, विभाग प्रमुख संजय दळवी, हेमंत रामपुरे, अमित नाईक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment