Thursday, 7 August 2025

मुरबाड येथे फ्लॅगशिप योजना कार्यक्रम — मेरा युवा भारत ठाणे यांच्यातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन !!

मुरबाड येथे फ्लॅगशिप योजना कार्यक्रम — मेरा युवा भारत ठाणे यांच्यातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन !!

मुरबाड ( मंगल डोंगरे ) :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत "मेरा युवा भारत – ठाणे" यांच्यातर्फे महाराष्ट्र युवा संघ, कल्याण, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड, आणि गर्जा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. अविनाश बोंबे सभागृह, वन विभाग, मुरबाड, जिल्हा ठाणे येथे फ्लॅगशिप योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्यात हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. त्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. मनिषा शर्मा – जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत – ठाणे, राजेश गुलाब वाघे – गट समन्वयक, स्वच्छ भारत मिशन, पंचायत समिती मुरबाड योगेंद्र बांगर – भारत सरकारचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी मार्गदर्शक, गर्जा प्रतिष्ठान संथापक अध्यक्ष नितेश डोंगरे, ग्रीन इंडिया अभियानावर मार्गदर्शन रुपेशजी खाटेघरे, अजित कारभारी – राज्य युवा पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीय साहसी क्रीडा योजना व तेंजिंग नोर्गे व शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्काराविषयी मार्गदर्शक, प्रविण भालेराव – संस्थापक, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन, योगेश तेलवणे – पत्रकार, मुरबाड आदि मान्यवर उपस्थित होते. न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. राकेश पाडवी, कविता पवार, देवयानी जगताप, नीता दळवी, नीलम लिहे,आणि दुर्गा पष्टे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व जनजागृती करण्यात आली. 

कार्यक्रमाची सुरुवात गर्जा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या प्रभावी पथनाट्य सावधान दंगल पेट घेत आहे. या सादरीकरणाने झाली, ज्यामध्ये जातीयता, मोबाईलचा गैरवापर, प्रेमसंबंधातून होणाऱ्या गुन्हेगारी घटना, स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रमाण, पर्यावरण संरक्षण व स्वच्छता यासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर युवक-युवतींमध्ये जनजागृती करण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील युवक-युवतींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मेरा युवा भारत – ठाणे या उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या एकूण १३३ युवक-युवतींना जिल्हा युवा अधिकारी मा. मनिषा शर्मा यांच्या हस्ते भारत सरकारच्या प्रमाणपत्राने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन साहिल भवार, निलेश यादव, अजिंक्य डोंगरे, तुषार कडाली आणि त्यांच्या सहकार्यांनी केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...