Thursday, 7 August 2025

एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यां विरोधात समाज परिवर्तन पक्षाचा महामोर्चा...

एह तो ट्रेलर था, फिक्चर अभि बाकी है - जयसिंग गायसमुद्रे ,,

**एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यां विरोधात समाज परिवर्तन पक्षाचा  महामोर्चा...*

ठाणे (प्रतिनिधी) : एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरिबांना घरकुल योजना बहाल करत आहेत, तर दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्रात एम.आय.डी.सी. चे अधिकारी गोरगरीब जनता, आपली खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करून, उभ्या आयुष्याची पुंजी जमा कशी बशी घरं उभारली आता तीच  गरिबांची घरे जमीनदोस्त करण्याचे कुटील राजकारण्याच्या सांगण्यावरून एम.आय.डी.सी. चे अधिकारी गोरगरिबांना बेघर करण्यात मशगुल झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रचलेला कुटील डाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. जयसिंग गायसमुद्रे यांनी हाणून पाडण्यात यशस्वी झाल्याचे आजच्या महामोर्चात दिसून आले.

शासकीय नियमानुसार 2011 पासून शिळफाटा महापे परिसरात वास्तव करत असणाऱ्या त्या स्थानिकानां कायम करून, संबंधित प्रशासनानी त्याची योग्य ती तजबीज करणे बंधनकारक आहे.असे न करता एम.आय.डी. सी. प्रशासन संबंधित असणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधी च्या हवाशा पोटी, संबंधित जागेचा शासकीय सर्व्हे करून गोरगरिबांचा संसार उद्धवस्त करण्याचा कट कारस्थान करत आहेत.त्याच्या या हुकूमशाही विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष जयसिंग दत्तू गायसमुद्रे यांच्या नेतृत्वा खाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचं निळं वादळ शेकडो कार्यकर्ताच्या उपस्थितीत धडकले,
घरं आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बाप्पाची..!

आर..!  कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय..! अश्या गगनभेदी गर्जना करत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष जयसिंग गायसमुद्रे यांनी पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थाने सुरुवात केली. 

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णराम पांचाळ यांना निवेदन देऊन "आपली व्यथा आणि कथा" त्यांच्या समोर मांडल्या, त्यांनी सुद्धा या मोर्चाला दुजोरा दिला, नियमानुसार शक्य होईन तेवढे सहकार्य करू असे आश्वासन यावेळी जिल्हा धिकारी पांचाळ यांनी दिले. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयसिंग गायसमुद्रे यांनी सिद्धेशवर वार्ता किरण शी बोलतांना सांगितले की, मोर्चा तर हा ट्रेलर होता, गोरगरीब जनतेला घराचे योग्य तो नियोजन करावे त्यांना बेघर न करता त्यांना कायम स्वरूपाचे राहण्यास घर द्यावे, हीच मागणी आमची आदरणीय जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण राम पांचाळ सराकडे केलेली आहे, त्यांनी तोंडी आश्वासन दिले आहे, शासन दरबारीं तोंडी आश्वास नास शून्य महत्व दिले जाते, ते आम्ही जाणून आहोत, " शासकीय काम अन दहा महिने थांब"असे होऊ दिल्या जाणार नाही, माझा पक्षाच नावच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आहे, आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकराचे आम्ही अनुयायी आहोत, बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा, गोरगरीब जनतेचा राष्ट्रीय परिवर्तन पक्ष करणार फायदा, एवढं मात्र नक्की, जर या मोर्चाने प्रशासनाला जाग येत नसेन तर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देतोय..! "यह ट्रेलर है शासकीय बाबू, फिक्चर अभि बाकी है,असे म्हणत राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे सर्वसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष जयसिंग गायसमुद्रे  यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.या महामोर्चाचा इंफॅक्ट प्रशासनावर होतो की, राष्ट्रीय परिवर्तन पक्षाला गरिबांना न्याय देण्याकरिता प्रशासनाच्या विरोधात आगेकूच करावी लागते हे पाहणे तितके महत्वाचे ठरू शकणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...