Friday, 15 August 2025

स्वातंत्र्यदिनी जिल्हा परीषद केंद्रशाळा भुवन येथे गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण !!

स्वातंत्र्यदिनी जिल्हा परीषद केंद्रशाळा भुवन येथे गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण !!

मुरबाड (श्री. मंगल डोंगरे )

     भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असून मुरबाड तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक केंद्रशाळा भूवन येथेही धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुरबाड तालुक्यातील अनेक गावातील शाळांमध्ये इयत्ता १० वी आणि १२ वी परिक्षेत गावातून प्रथम आलेल्या विद्यार्थाच्या हस्ते ध्वजारोहण फडकविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे, या अनुषंगाने ग्रामपंचायत भूवन या ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वीच ग्रामसभेत ठराव घेऊन व शाळा व्यवस्थापन समितीला शिफारस करुन ध्वज फडकविण्याचा सन्मान माध्यमिक शालांत परीक्षेत सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात भुवन गावातून प्रथम क्रमांक पटकावलेला व गावातील जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेतलेला, श्री. यशवंत हरी भोईर यांचा सुपुत्र कु. प्रथमेश यशवंत भोईर या विद्यार्थ्याला शाळेचा ध्वज फडकविण्याचा मान मिळाला. प्रथमेशला इयत्ता १० वी  मध्ये ७८ % गुण मिळाले आहेत.  

      ग्रामपंचायत भुवन व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा भुवन व्यवस्थापन समितीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा निर्णयामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळते व आपल्या गावातील शाळेत देशाचा राष्ट्रध्वज फडकविण्याचा सन्मान मिळणे निश्चितच भुषणावह असल्यामुळे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने अभ्यास करतात.

      जिल्हा परीषद प्राथमिक केंद्रशाळा भूवन येथे साजरा केलेल्या भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी भुवन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रमिला बांगर, मा. सरपंच श्री. रघुनाथतात्या बांगर, मा. सरपंच सौ. दर्शना बांगर, ग्रामपंचायत सदस्य सौ. माया लक्ष्मण भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दिलीप बांगर, आणि  जि. प. शाळा भुवनचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, यांच्यासह शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...