79 व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून जि. प. गट कुडवली मध्ये डॉ. प्रियदर्शनी पवार यांच्याकडून सर्व शाळांना भारतीय संविधान भेट !!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) :
शुक्रवार, दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद गट, कुडवली मधील सर्व शाळांमध्ये मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व डॉ. प्रियदर्शनी चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाची पुस्तिका भेट व तीन हजार विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
भारतीय संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रस्ता आदी बाबी सरकारला उपलब्ध करून देण्यास भाग पाडते तसेच संविधानामुळेच देशाची लोकशाही हे टिकून राहू शकते त्यामुळेच ह्या स्वतंत्र दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान कुडवली गटातील सर्व जि. प. शाळांना भेट देत असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रियदर्शनी पवार यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटी मधील पदाधिकारी विपुल सुरोशे, हरिश्चंद्र झुंजारराव, मनोहर इसामे, ओमकार मोहपे, गुरुनाथ देशमुख, दिलीप कराळे, जगदीश पवार, वसंत कराळे , अशोक भावार्थे, धनाजी बांगर, नेताजी लाटे, दिनेश सासे, दशरथ चौधरी, अनिल चिराटे, अमोल चौधरी, रजाक शेख आदींच्या हस्ते जिल्हा परिषद गटातील ३० शाळांमध्ये भारतीय संविधान मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. भारतीय संविधाना मधील प्रत्येक कलम व उप कलम हे विद्यार्थी दशेपासूनच त्याबाबतचा अभ्यास व माहिती ही विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे म्हणून सदरील उपक्रम केल्याची माहिती चेतनसिंह पवारांनी यांनी दिली.
No comments:
Post a Comment