Friday, 15 August 2025

मुरबाड बस आगाराच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो विद्यार्थी मुकले ध्वजारोहणास !!

मुरबाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!      

**मात्र मुरबाड बस आगाराच्या भोंगळ कारभारामुळे  शेकडो विद्यार्थी मुकले ध्वजारोहणास **

मुरबाड :-{मंगल डोंगरे} : भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन देशभरात साजरा करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असताना, ऐन १५ ऑगस्ट रोजी मुरबाड बस आगाराच्या भोंगळ कारभारामुळे अचानक बंद ठेवण्यात आल्याने शेकडो शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना ध्वजारोहणास मुकावे लागल्याने मुरबाड आगाराचे मनमानी कारभारामुळे प्रवाशी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

           तर मुरबाड तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती तसेच न्यु इंग्लिश स्कूल, नगर पंचायत या ठिकाणी मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असला. तरी शेकडो अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना ध्वजारोहणास मुकावे लागले आहे. मुरबाड मधिल नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना एस. टी.चा सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी जानेवारी मध्ये सहा  इलेक्ट्रिक बस उपलब्ध केल्या परंतु आगार व्यवस्थापक योगेश मुसळे यांनी या बसेसची सुविधा तालुक्यातील प्रवाशांना न देता जुन्नर आळेफाटा नगर अशा घाटमाथ्यावरुन येणाऱ्या वाहक चालकांना दररोज घरी जाता यावे म्हणून त्या बसेस तिकडे वळविल्याने या इलेक्ट्रिक बस कशा आहेत. हे बघायला सुध्दा मुरबाड मधिल प्रवाशांना मिळाले नाही. असे असताना १५ ऑगस्ट रोजी वाहक चालकांना सुट्टी मिळावी म्हणून कल्याण, शहापूर, बदलापूर, म्हसा, धसई, माजगाव, कान्हार्ले, करवेळे, हिरेघर, गोरखगड, खांडपे, भादाणे, खेडले, कोरावळे या उत्पादन देणाऱ्या फेऱ्या अचानक बंद केल्याने पहाटे घरातुन झेंडा वंदना साठी निघालेले शासकीय अधिकारी कर्मचारी व शालेय विद्यार्थी हे बसची वाट बघत होते. परंतु लाखो रुपये महसुल देणाऱ्या या बसेसच्या फेऱ्या अचानक आगार प्रमुखांनी बंद केल्याने शेकडो प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत पशुसंवर्धन विभाग याठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण झाले असले तरी शेकडो अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी झेंडा फडकविण्यास मुकले आहेत.

        दरम्यान काही प्रवाशांनी बसेसवर अवलंबून न राहता खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या भंगार वाहनाचा धोकादायक प्रवास पत्करून एस महामंडळाचे कारभारावर नाराजी व्यक्त केली.
        !!  मुरबाड आगार प्रमुखांनी ऐन १५ ऑगस्ट रोजी या फेऱ्या बंद का केल्या आहेत याची चौकशी करून अहवाल मागितला जाईल.सचिन पळसुले. विभागिय नियंत्रक ठाणे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...