ठाणे जिल्ह्यात अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची घोडदौड सुरूच !!
**मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका शाखा मुरबाडचा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न**
मुरबाड, (मंगल डोंगरे) ::महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये कलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड सुरु असुन आज तालुका शाखा मुरबाड या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष सागर भावार्थे यांनी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोळे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यभार सोपविण्यात आला. त्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणा निहाय निवड करण्यात आल्या. यावेळी तालुका उपाध्यक्ष पदी सचिन पोतदार व राजु गोडांबे सरचिटणीस पदी नितेश डोंगरे, कार्याध्यक्ष पदी भरत विशे, संपर्क प्रमुख कानिफनाथ भावार्थे, विभाग प्रमुख तानाजी माळी, महादु वडवले, दिपक घागस तर उपविभाग प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर भोईर, महेंद्र भावार्थे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तर उर्वरित नियुक्ती नंतर होणा-या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत.
खरेतर कलावंत मंडळी ही आपल्या अंगी असणा-या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात. मग समाज यांना त्या बदल्यात काय देतो. तर काहीच नाही. मात्र सरकारच्या विविध योजना या कलावंत मंडळींसाठी अधोरेखित असतात. परंतु या योजना त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत आणि अनेक वर्षे हे लोकं या योजनांपासून उपेक्षित राहतात.अशा कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने पुढाकार घेतला असून ठाणे जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात जाऊन तळागाळातील कलाकारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शासनाच्या या राजश्री शाहू महाराज साहित्यिक, वारकरी कलावंत मानधन योजने अंतर्गत कलाकारांना दरमहा 5000/-रुपये मानधन मिळवून देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी , कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे या ठिकाणी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करुन गोरगरीब व्रुद्ध कलावंतांमध्ये जनजागृती करुन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शहापूर तालुका अध्यक्ष नरेश निमसे, कल्याण तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष बाळा पोंडेकर, यांसह अनेक मान्यवर या प्रक्रियेत सक्रियतेने काम करत असुन, मुरबाड येथील नियुक्ती पत्र प्रदान करते वेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment