Saturday, 2 August 2025

समाजात तेढ निर्माण करणा-या आमंदार शरद सोनवणे वर गुन्हा दाखल करा..... साहित्यिक. नामदेव भोसले

समाजात तेढ निर्माण करणा-या आमंदार  शरद सोनवणे वर  गुन्हा दाखल करा..... साहित्यिक. नामदेव भोसले

पुणे, (प्रतिनीधी, स्नेहा उत्तम मडावी) :

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध ! आज आखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीन सदर आमंदार शरद सोनवणे यांनी जातीय अपशब्दांचा वापर करून आदिवासी पारधी समाजाला जातीय शब्दांचा वापर करुन जातिय तेड निर्माण करुन आदिवासी पारधी बांधवाना अपमानीत वागणुक दिल्याबद्दल त्यांच्या अट्रॉसिटी ऑट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.... जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आमदार शरद सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजावर केलेले बिनबुडाचे, जातीयवादी आणि आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्णपणे निंदनीय आहे ! संपूर्ण समाजाला चोरीसारख्या गुन्ह्यांचा ठपका ठेवणे हे केवळ चुकीचे नाही, तर कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात आहे. या वक्तव्यामुळे निष्पाप कुटुंबांची मानहानी होत असून, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मानासाठी झटणाऱ्या या वंचित समाजांचे भवितव्य धोक्यात येत आहे. अशा प्रकारची बेताल विधाने समाजात तेढ निर्माण करतात आणि सामाजिक सलोख्याला बाधा आणतात. आमदार शरद सोनवणे यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा व या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी आम्ही करतो ! आम्ही आदिवासी पारधी आणि रामोशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणताही समाज गुन्हेगार नाही; प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे!आमदारांनी जबाबदारीने बोलावे, समाजाला जोडावे, फोडू नये अशा विचाराने काम लेले पाहिजे. 


देवा नमस्कार ; आपणाला एक विनंती आहे हे असे एक जबाबदार पदावर असलेल्या जुन्नर चे आमदार सोणवणे यांनी कोणी जातीवर बोलणे शोभत नाही कोणी गुन्हेगार जात नस्ते गुन्हेगार हा व्यतिरिक्त वेक्ती असतो.. हे असे कोणी जातीवर समाजावर कोणत्या समाजावर  बोलणे हा अधिकार कोणाला नाही... आणी म्हनुन आपल्याला आहे आपण आमच्या विचाराची दखल घेऊन आपण आमंदार सोनवणे यांच्या विरोधात आमची तक्रार ऑट्रासिटी ॲक्ट अतंर्गत गुन्हा दाखल करून घ्यावा व तक्रार घेण्यासाठी ऊरळी कांचन पोलीस स्टेशन ला आदेश देण्यात यावे अशा मागणी चे निवेदन आखिल भारतीय आदिम महासंघाचे अध्यक्ष व साहित्यिक 
नामदेव भोसले यांनी आमंदार सदाभाऊ खोत व इंदापुर चे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले या वेळी दिलीप भोसले, संजय भोसले, दिलीप काळे, सचिन भोसले, बाबा भोसले, पिटु भोसले, सतिश पवार व महिला आदिवासी पारधी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...