Tuesday, 12 August 2025

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे लोकार्पण !!

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे लोकार्पण !!

मुरबाड- ( श्री. मंगल डोंगरे ) : ९ ऑगस्ट हा दिवस संपुर्ण भारतात आदिवासी क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, तथा कार्यसम्राट आमदार किसन कोरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. खरे तर मुरबाड नगरपंचायत मध्ये असुनही मधील प्रभाग क्रमांक 2 मधील आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या भागात स्वातंत्र्याच्या 76 वर्षा नंतर विकास दिसून आला असून, स्थानिक नगरसेविका मानसी मनोज देसले व त्यांचे पती जनसेवक मनोज रमेश देसले यांनी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण कायापालट केला असून कधी नव्हे ती विकासाची विविध कामे पाहायला मिळत आहेत.

यामध्ये सुसज्ज नविन सभागृह, तरूणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा व बलोपासनेसाठी हनुमंताचे मंदिर या हायटेक  वास्तुंचे लोकार्पण आदिवासी गौरव दिनी करून आदिवासी बांधवांना एक अनोखी भेट दिली आहे.

मुरबाड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हात अशा प्रकारचा आदिवासी वस्तीतील विकास पाहायला मिळत असून देसले दांपत्यांनी हे काम करून दाखविल्या बद्दल आमदार कथोरे यांनी दोघांचे मनापासून कौतुक केले आहे. तुम्ही काम करत राहा मी तुमच्या पाठीशी आहे काही नगरसेवक बोलण्यात पोपट आहेत. माझ्याशिवाय ते नगरपंचायत मध्ये कशी कामे करतात हे मला पाहायचे आहे असा सज्जड दम त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या त्या नगरसेवकांना दिला आहे. मुरबाडचा विकास थांबणार नाही तर तो अधिक जोमाने होत राहिल पाहिजे तेवढा निधी मुख्यमंत्री द्यायला तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .

यावेळी जनसेवक मनोज देसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही राजकारणात तत्वाशी गद्दारी करणार नाही एकवेळ राजकारण सोडू पण गद्दारी नाही. जे आहे ते प्रामाणिक पणे करतो .समाजाजाप्रती आपल्या भावना काय आहेत हे महत्वाचे असल्याची भावना प्रास्ताविकात व्यक्त केली. तर या प्रसंगी स्थानिकांनी देसले दांपत्या विषयी भावना व्यक्त करताना असा नगरसेवक आमच्या आयुष्यात कधी पाहिला नसून प्रत्येकाच्या सुख दुखात येऊन चौकशी करणारा हा नगरसेवक असून कधी नव्हे तो आमच्या वाडीचा  विकास केल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने मानसी देसले व मनोज देसले यांचा भव्य सन्मान करण्यात आला. 

या लोकार्पण सोहळ्यासाठी सुरेश बांगर, दिपक पवार, सुधीर तेलवणे, मोहन सासे, नगरसेविका मधुरा सासे, साजई सरपंच सौ.सासेताई, तानाजी मोरे, अक्षय रोठे, कृष्णकांत मलिक, दिनेश उघडे, जगन माळी, केशव देसले, मिलींद मडके, सचिन चौधरी, अक्षय आगिवले, यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी आदिवासी महिला व तरूणींनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करून आमदार कथोरेंचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...