Friday, 22 August 2025

समाजसेवक शरद पवार यांचे मतचोरीच्या विरोधात उपोषण !!

समाजसेवक शरद पवार यांचे मतचोरीच्या विरोधात उपोषण !!

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा आरोप होत असून आजही मुरबाड मतदार यादीत शहापूर तालुक्यातील शेकडो मतदारांची नावे नोंदलेली आहेत. ही मतचोरी म्हणजे  लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आहे. देशात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘मी मतचोरीच्या विरोधात’ या मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाडमधील समाजसेवक शरद पवार यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी बोगस, दुबार, स्थलांतरित, मयत, अल्पवयीन तसेच बाहेरील घुसवलेली नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. उपोषणादरम्यान त्यांनी प्रशासनाकडे बोगस मतदारांचे ठोस पुरावेही सादर केले, ज्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये ९० टक्के लोकसंख्या एकाच आडनावाची असतानाही मतदार यादीत शर्मा, वर्मा, तेंडूलकर, मुठोळकर, कुर्लेकर, चव्हाण आदी बाहेरील आडनावे मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जवळपास २५ हजार बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे समाजसेवक शरद पवार यांनी यावेळी उपोषणाचा मार्ग स्वीकारत मतचोरांना उघडे पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे

No comments:

Post a Comment

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !  आमच्या आयुष्याचं केलं सोनं  देहाचे झिजून केले चंदन... ज्ञानाच्या महासागराला  अ...