Wednesday, 17 September 2025

वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर यांनी पटकाविले दोन रौप्य पदक !!

वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर यांनी पटकाविले दोन रौप्य पदक !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग, फुंडे, उरण मधील कु. आर्यन मोडखरकर आय.टी. तील  विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाच्या जलतरण स्पर्धेत महाविद्यालयाचे नेतृत्व केले. या स्पर्धा दि. १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी डोंबिवली, पलावा सिटी मधील जलतरण तलावामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेत कु. आर्यन वीरेश मोडखरकर याने ५० मीटर बटरफ्लाई व ५० मीटर बॅक स्ट्रोक अशा दोन स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाला रौप्य पदक  मिळवून दिले. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, महाविद्यालय विकास समिती सदस्य भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक आणि जिमखाना प्रमुख देवेंद्र कांबळे व सर्व जिमखाना सदस्यांनी अभिनंदन केले त्याच बरोबर प्रांजल भोईर यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...