Tuesday, 16 September 2025

सन्माननीय आमदार श्री. राजेश मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन व शुभेच्छा !

सन्माननीय आमदार श्री. राजेश मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन व शुभेच्छा !

डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार माननीय श्री. राजेश मोरे साहेब यांचा वाढदिवस दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी विविध ठिकाणी अत्यंत उत्साही व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला समाजातील प्रत्येक घटकाने सहभाग नोंदवत एकात्मतेचा, परस्पर सहकार्याचा आणि सार्वजनिक हिताचा संदेश दिला.
     महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या कृपाआशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे सर्वसामान्य शिवसैनिक असलेल्या आमदार श्री. राजेश मोरे यांना जनतेच्या विश्वासावर आधारित निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली राजेश मोरे साहेबांनी जनतेचा मोठा आशीर्वाद मिळवून विजयी होत आमदारपदावर पोहोचण्याचा मान मिळवला. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माननीय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन आमदार श्री. राजेश मोरे यांनी “जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहणे” हा मंत्र आत्मसात केला आहे. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जनतेच्या समस्यांसाठी कार्यरत राहून लोकांचे मन जिंकण्याची त्यांची सेवा वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

       काल आमदार श्री राजेश मोरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणसामग्रीचे वाटप, आजारी व गरजू रुग्णांना फळांचे वितरण, तसेच धार्मिक, आरोग्य विषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार श्री. राजेश मोरे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेच, याशिवाय इतर पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उत्साहाने सहभागी झाले. पक्षीय मर्यादा ओलांडून सर्वांनी एकत्र येत हा सोहळा साजरा केला.
     वाढदिवसाच्या दिवशी देखील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी आमदार श्री. राजेश मोरे साहेबांनी हसतमुखाने संवाद साधत आपुलकीचे वातावरण निर्माण केले. गर्दीत असतानाही प्रत्येकाला आपलेपणाने भेटण्याची त्यांची शैली उपस्थितांचे मन जिंकणारी ठरली. एवढ्या गर्दीतही हसरा चेहरा आणि संवाद साधण्याची मिश्किलशैलीने अभिवादन करणे हे फार कमी लोकांना जमते त्यातील एक आमचे मोरे साहेब आहेत. त्यांच्या स्मितहास्याने व समरसतेने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांमध्ये उत्साह आणि आनंदाची भावना निर्माण झाली. वाढदिवसाचा हा सोहळा सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. 
     सर्व क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनतेच्या सेवेसाठी यशस्वी कार्य करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देवून आमदार श्री. राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विकास अधिक वेगाने घडून येईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यांच्या कार्याची व सेवा वृत्तीची सर्वत्र प्रशंसा होत असून त्यांच्या प्रेरणेतून मतदार संघासह इतर भागातील देखील अनेक तरुण आणि कार्यकर्ते जनतेच्या हितासाठी काम करण्यास पुढे येत आहेत.
     पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कार्य तत्पर आमदार माननीय श्री राजेश मोरे साहेबांना वाढदिवसाच्या आणि उज्वल कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐

 शुभेच्छुक, 
                   🙏
श्री प्रकाश शांताराम माने.
     (माजी नगरसेवक)

    सौ प्रतीक्षा प्रकाश माने.
 शिवसेना, उप-शहर संघटक, 
महिला आघाडी, डोंबिवली शहर.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...