Tuesday, 16 September 2025

आगामी निवडणुका ताकदीने लढण्याचा जनता दल (से.)चा ठराव : नाथाभाऊ शेवाळे

आगामी निवडणुका ताकदीने लढण्याचा जनता दल (से.)चा ठराव : नाथाभाऊ शेवाळे

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जनता दल (से.) महायुतीचा घटक पक्ष म्हणून ताकदीने निवडणुका लढवेल असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.यासोबतच पुढील महिन्यात भारताचे माजी पंतप्रधान व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीबाबतही चर्चा करण्यात आली. त्यांच्या जंगी स्वागताचे आयोजन आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला.
               बैठकीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान अधोरेखित करण्यात आले. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, यासाठी निवेदन संबंधित विभागाला सादर करण्याबाबत ठराव घेण्यात आला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, सलीम भाटी, ज्योती बडेकर, युवा नेते ॲड. संग्राम शेवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...