Tuesday, 16 September 2025

आदर्श मुंबई फाऊंडेशनचा १०वा वर्धापन दिन सोहळा मुंबई येथे विकास कॉलेज सभागृह येथे संपन्न !!

आदर्श मुंबई फाऊंडेशनचा १०वा वर्धापन दिन सोहळा  मुंबई येथे विकास कॉलेज सभागृह येथे संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            आदर्श मुंबई संचलित महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल चॅनल - पंचरत्न मित्र मंडळ व ओंकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुंबई फाऊंडेशनचा १०वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबई येथे विकास कॉलेज सभागृह येथे पार पडला. कार्यक्रमात मुंबई युवा कला महोत्सव २०२५' चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील आदर्श समाज सेवक तसेच कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात बालकांनी सुंदर नृत्य व गायन सादर केले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निःस्वार्थ समाज सेवकांना इंडियन एक्सेलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सन्मा. सुधीर सावंत माजी खासदार (निवृत्त ब्रिगेडीअर) ,रविंद्र मालुसरे - अध्यक्ष मुंबई मराठी वृत्तपत्र संघ, सौ.सुवर्णाताई करंजे - शिवसेना उपनेत्या, श्री. उपेंद्र सावंत मा नगरसेवक, प्रसिद्ध कोळी गीत गायक संतोष चौधरी (दादूस), श्री. संतोष शिकतोडे - प्रसिद्ध समाज सेवक तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सागर नटराज, श्री अशोक भोईर (अध्यक्ष), डॉ. संजय भोईर (आयोजक) तर संयोजक - संदिप श्रीवर्धनकर, पूनम पाटगावे, गौतम डांगळे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले कार्यक्रमात विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. शुभचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशील मेस्त्री यांनी केले.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...