Tuesday, 16 September 2025

"रात्रशाळांना नवी दिशा – 'मासूम'च्या कार्यशाळेतून मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग"* !!!

"रात्रशाळांना नवी दिशा – 'मासूम'च्या कार्यशाळेतून मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग"* !!!

मुंबई, दि. १६, विश्वनाथ राऊत (दै. बातमीदार) :

तळेगाव, इगतपुरी येथे दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी विंटेज व्हॅली रिसॉर्ट येथे "निवासी मुख्याध्यापक कार्यशाळेचे" यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत रात्रशाळांच्या मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, नवनवीन शैक्षणिक उपक्रमांचा अवलंब करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दिशा शोधणे, हे उद्दिष्ट साध्य झाले.

या कार्यशाळेमध्ये मुख्याध्यापकांनी सक्रिय सहभाग, ऊर्जा व नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. या प्रसंगी "मासूम" संस्थेकडून पाठविलेल्या संदेशामध्ये मुख्याध्यापकांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रात्रशाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, समस्यांवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी "मासूम" संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. या कामगिरीमुळे रात्र शाळांची प्रगती होत असून त्यांची गुणवत्ता सातत्याने वाढत आहे.

या सर्व उपक्रमामागे *संस्थेच्या संचालिका सन्माननीय निकिता केतकर मॅडम* यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व कार्यकुशलता, तसेच कार्य सांभाळणाऱ्या "मासूम" परिवारातील सहकाऱ्यांचे योगदान अतिशय कौतुकास्पद आहे.

 *रात्रशाळांच्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांतर्फे "मासूम" संस्थेच्या या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.*

No comments:

Post a Comment

ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्या...