Saturday, 6 September 2025

कल्याण येथील दंत चिकित्सक डॉ ब्रिजेश पांडे यांची सामाजिक बांधिलकी !!

कल्याण येथील दंत चिकित्सक डॉ ब्रिजेश पांडे यांची सामाजिक बांधिलकी !!

** चौदा वर्षांखालील मुली तसेच सैनिकांना मोफत उपचार 

कल्याण, प्रतिनिधी : मुंबईला लागून असलेल्या कल्याण शहारातील हाजीमलंग रोड वरील डॉ ब्रिजेश पांडे एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांनी स्वतःचा वैद्यकीय पेशा सांभाळून अनेक सामाजिक कार्य केले आहे. डॉक्टरांचा एक सामाजिक उपक्रम गेले सात वर्षे समाजातील चौदा वर्षे आतील सर्व मुलींची तसेच सैनिकांचा दातांचा मोफत उपचार करत आहेत. 

डॉक्टरांच्या मते प्रत्येक मुलगी ही दुर्गामातेचे स्वरूप आहे तीची सेवा हे करणे दुर्गामातेची पूजा करण्यासारखे आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितले हा संकल्प कसा सुरू झाला ते एकदा एक स्त्री आपल्या मुलीच्या दातांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात आली असता तिची परिस्थिती नसल्याचे लक्षात येतात त्यांनी तिच्याकडून एकही रुपया न घेता चौदा वर्षांपर्यंत सर्व मुलींवर मोफत उपचार करतो असे सांगत त्या दिवसापासून जो संकल्प हाती घेतला त्या ॳतर्गत आजपर्यंत ३००० (तीन हजार) पेक्षा अधिक मुलींवर मोफत उपचार केले आहेत.

सर्वसाधारणपणे चार ते चौदा वयोगटातील मुलींमध्ये दातांविषयी अनेक समस्या निर्माण होतात जशी दातांना किड लागणे, ही समस्या चुकीचे खाणे, गोड खाणे, व्यवस्थित दात घासणे यामुळे होतात असे सांगत त्यांनी सांगितले की देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे अशा सैनिकांना सुध्दा जर काही दातांसंबधी समस्या असेल तर आम्ही उपचार मोफत करतो.

डॉक्टरांच्या समाजाप्रती असलेली निष्ठा व त्यांचे समाजासाठी करत असलेले कार्य यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...