Saturday, 6 September 2025

संविधान जनजागृती प्रशिक्षण शिबिर – कल्याण येथे यशस्वीरीत्या संपन्न !!

संविधान जनजागृती प्रशिक्षण शिबिर – कल्याण येथे यशस्वीरीत्या संपन्न !!

कल्याण, प्रतिनिधी : दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी कल्याण येथील ग्लोबल व्हिजन चर्च येथे मा. विशाल जी दामले यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संविधान जनजागृती प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले सुमारे 150 हून अधिक देवाचे सेवक सहभागी झाले. या प्रसंगी संविधान अभ्यासक श्री. नूरखॅा पठाण (महाड) यांनी संविधान विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष श्री. विशाल दामले साहेब यांनी संविधान जागृतीचे महत्व स्पष्ट केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबविण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी ख्रिस्ती सामाजिक संस्था पास्टर आशिष मोरे (व्यवस्था), श्री. प्रवीण गुंजाळ (सूत्रसंचालन), मिसेस मोनिका दामले व महिला अध्यक्ष राजेश्री भालेराव, श्री. संदीप कांबळे व त्यांची टीम यांचे विशेष योगदान राहिले.‌ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. दिनेश वाघचौरे (उपाध्यक्ष) यांनी केले.
मराठी ख्रिस्ती सामाजिक संस्था

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...