Tuesday, 9 September 2025

मुरबाड मध्ये मोठ्या उत्साहाने मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलादुनबी सण साजरा !!

मुरबाड मध्ये मोठ्या उत्साहाने मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलादुनबी सण साजरा !!

मुरबाड ( मंगल डोंगरे ) : काल तालुक्यातील मुरबाड शहरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात मुस्लिम बांधवांचा ईद ए  मिलादुनबी हा सण साजरा करण्यात आला. 

खरेतर गेले बारा दिवस या बांधवांची  मधलीश असते. या बारा दिवसांत सकाळी नमाज पठण, तसेच रात्री दररोज धर्मग्रंथाचे वाचन होते. त्यानंतर बाराव्या दिवशी मोहम्मद पैगंबर यांची मिरवणूक काढली जाते. ही फार जुन्या काळची म्हणजेच 1500 वर्षाची परंपरा असुन याला ईद ए मिलादुनबी असे म्हणतात. यावर्षी सालाबादप्रमाणे यंदाही या मिरवणुकीचे कार्यक्रम अत्यंत शांततेने पार पडला. त्यात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. त्यात नगरसेवक नितीन आण्णा तेलवणे, नगरसेविका नम्रता तेलवणे, सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संतोष विशे, साहिल सय्यद, माजी नगरसेवक हमीद पानसरे, रविंद्र देसले, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख मंगेश भुसारी, मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप गिते, एपीआय-बोलके साहेब, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष मतीन पठाण व मुस्तकिम सय्यद अशपाक बेग, सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट मुरबाड यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...