बंजारा मित्र मंडळाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..
अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील मोरिवली गाव येथे बंजारा वस्ती येथील बंजारा मित्र मंडळाचा गणपती भटके विमुक्त सामाजिक संस्था अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भटक्या जातीतील अनेक वर्गातील प्रतिनिधी एकत्र येऊन एकी व समतेचा संदेश दिला.
सार्वजनिक गणेशउत्सव निमित्त महा आरती, महाप्रसाद भोग भंडारा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी महा आरतीचा मान रवींद्र शेलार यांना मिळाला.
यावेळी भटके विमुक्त समाजाचे रिंकू गारुंगे, अविनाश सुक्रे, कंजार भाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनोद तामचेकर, व्यावसायिक तसेच समाजसेवक संजय मगर सह भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे व मनिलाल डांगे उपस्थित होते.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संजय डांगे,उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव प्रशांत जाधव, खजिनदार अजय डांगे, महेश डांगे, कृष्णा डांगे, दिनेश जाधव, तुषार डांगे,जतीन डांगे, साहील जाधव, साइदीप डांगे, क्रिश जाधव सह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
No comments:
Post a Comment