Monday, 8 September 2025

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते 'कोनिकल गाॅफर्स'चे उद्घाटन !

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते 'कोनिकल गाॅफर्स'चे उद्घाटन !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील प्रसिद्ध 'कोनिकल गाॅफर्स' या वॅफल्स शाॅपचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रविवारी उलवे नोडमध्ये करण्यात आले. नवी मुंबईतील हे पहिलेच शाॅप आहे. उलवे नोडमधील सेक्टर २३ मध्ये रुपाली पाटील आणि ॠषिकेश म्हात्रे यांनी हे सुरू केले आहे.

देशभरात 'कोनिकल गाॅफर्स' वॅफल्स शाॅपच्या १३० शाखा आहेत. यावेळी श्रीकांत घरत, हनुमान पाटील, अलका पाटील आणि कुटुंबीय उपस्थित होते. रुपाली पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे या दाम्पत्याने परदेशात उच्च शिक्षण घेऊन नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला ही भूमिका घेऊन भारतातील प्रसिद्ध ब्रॅडचे उलव्यात शाॅप उघडल्याने महेंद्रशेठ घरत यांनी अभिनंदन केले आणि व्यवसायात भरभराट होऊन अनेक शाखा उघडल्या जाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...