दिवाळी आधीच गावगाड्यात पोहचला सगर दीपोत्सव दिवाळी अंक !!
नाशिक [ श्री .मंगल डोंगरे ] श्री स्वामी समर्थ कृपाकिंत सगर साहित्य परिवार निर्मित संपादक साहेबराव नंदन तात्या संपादीत, ललीतभाऊ साळवे, प्रा. डी. टी. पाटील, राजेंद्र गवळी, आर. जे. पाटील सह सहसंपादक असलेला दरवर्षी गावकुसाच्या काळ्याकसदार मातीच्या सुंगधाने व वैचारिक साहित्याने न्हाऊन निघत आलेला, यंदाही सर्वत्र न्हाऊन निघालेला, साहित्य क्षेत्रात व समाजात सर्वत्र चर्चेत राहून कौतुकास पात्र ठरलेला ह्या वर्षीचा चौथा सगर दीपोत्सव दिवाळी अंक २०२५. दिवाळी पर्वआधीच सर्वत्र प्रसिद्ध झाल्याने वाचकांच्या हृदयात जाऊन बसल्याच्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे संपादक गावगाडाकार साहेबराव नंदन [ तात्या ] यांनी साहित्य चर्चेत सांगितले. एकाच वेळी नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजी नगर धुळे नंदुरबार जळगाव ते चंद्रपूर नव्हे नव्हे संपादक द्वयीच्या मुळगाव ताहाराबाद येथे देखील बहुतांशी वाचकांच्या हाती अंक निदर्शणास येत असल्याची बोलकी भावोत्कट छबी ताहाराबादचे मा. सरपंच सगर रत्न पुरस्कार्थी ह.भ.प. काशिनाथ [ बापूजी ] नंदन हे हातात अंक घेऊन निवांतपणे दृष्टीक्षेप टाकत आहेत.
गुणी वाचकांच्या हाती अंक पोहचविण्यात सगर साहित्य परिवार बहुतांशी यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. वाढत्या महागाईच्या काळात अंक काढणे प्रसिद्ध करणे वेळेत वाचकांच्या हाती देणे शक्य होत नसले तरी तो निभावण्याचा अल्पसा प्रयत्न संपादकद्वयी दरवर्षी करत आले आहेत. अंकाची कुठेही विक्री केली जात नाही हे विशेष. शिवाय साहित्य क्षेत्रात सर्वत्र मोफत वितरण करण्यात येते. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर अंकाचे कामकाज सुरू आहे. अंकाच्या निर्मिती प्रकाशन पोस्टेज साठी बहुतांशी जाहीरातदार व समाज बांधव खेच्छेने सहकार्य करतात. त्याचा कुठेही गाजावाजा नसतो.
ताहाराबाद ग्रामपंचतीच्या सरपंच सौ. शितल नंदन ह्या सगर दीपोत्सव दिवाळी अंकावर एक दृष्टीक्षेप टाकतांना
गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात सगर साहित्याची निर्मिती असलेल्या सगर रत्न विशेषांक, सगर सेवार्थी व्यक्तिविशेष, स्नेहबंध विशेषांक, गावगाडा काव्यसंग्रह, परिसस्पर्श व्यक्ति चरित्र कादंबरी, मागील तीन सगर दीपोत्सव दिवाळी अंक सर्वच साहित्याला राज्यस्तरीय विविध संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ह्या ही अंकाला एका संस्थेचा लवकरंच राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार असल्याचे कळते.
No comments:
Post a Comment