आधार फाउंडेशनचा मुरबाड, शहापूर मध्ये एक अभिनव उपक्रम ....!!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) :
आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्था मुरबाड व सौ. सुचिता अभिजित मार्के यांच्या विशेष सहकार्याने जि. प.शाळा गवाळी, आंबेगाव, बोरिवली येथे लॅपटॉप वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे, शालेय माहिती संकलन करणे, विद्यार्थ्यांना लॅपटॉप मध्ये वल्ड, प्रोग्रॅम याची माहिती होण्यासाठी या लॅपटॉपची गरज आधार फाउंडेशन च्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.
गेल्या सहा वर्षापासून आधार फाउंडेशन सेवा संस्था मुरबाड, शहापूर, ठाण्यामध्ये कार्यरत आहे. बेरोजगार, शेतकरी, अध्यात्म, कामगार, शिक्षण यांसाठी काम करणारी संस्था आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास कोर, संजय घुडे, दत्तात्रय ढमके, भालचंद्र गोडांबे सर, संतोष घावट, शिवाजी घरत, गणेश भोईर, दिलीप कराळे, भास्कर बांगर हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नितीन राणे सर यांनी मेहनत घेतली.
लॅपटॉप वितरणवेळी बोरीवली सरपंच रेश्मा बाळाशेठ घरत, गवाळी सरपंच बाळू एगडे, पो. पा. कांताराम घरत, पालक वर्ग त्या त्या शाळेत उपस्थित होते. लॅपटॉप मिळाल्याबद्दल शाळाप्रमुख, विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment