सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे शारदोत्सव उत्साहात !!
उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा झाला.
सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा उत्सव गेली दहा दिवस प्रत्येक वर्गाकडून साजरा केला जातो. सकाळ व संध्याकाळी अशा दोन वेळा देवीच्या आरत्या घेवून भजन, गायन व वादन च्या माध्यमातून दररोज देवीचे जागरण केले जाते. अश्विन शुद्ध अष्टमीला म्हणजे सरस्वती पूजन दिवशी शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांना भंडारा म्हणजे पोटभर जेवण देवून विद्यार्थ्यांना तुप्त करून दांडियाचा आनंद दिला.
एकंदर दहा दिवस चालणारा हा उत्सव विद्यालयाच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता आनंदात साजरा केला जातो. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गिताताई पालरेचा यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेवून विद्यार्थ्यांना शारदोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या उत्सवासाठी संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, उप मुख्याध्यापिका अनिता पाटील, उच्च माध्यमिकचे विभाग प्रमुख संजय पाटील, पर्यवेक्षक पुनम कांबळे, लक्ष्मण मगरेपाटील, रमेश अहेर, सांस्कृतिक विभाग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती.
No comments:
Post a Comment