राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे नवदुर्गाचा सन्मान !!
उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे, कॅबिनेट मंत्री कु. अदितीताई तटकरे, प्रदेश अध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या कल्पनेतून, मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यामध्ये सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमा अंतर्गत उरण तालुक्यातील आशा वर्कर, डॉक्टर, प्राध्यापिका, बचतगट अध्यक्षा, गायिका, टेंपो चालवणा-या ताई महिला भगिनींना सन्मानीत करण्यात आले.
कुंदा वैजनाथ ठाकुर उरण तालुका महिला अध्यक्षा,निर्मला रामनाथ ठाकुर माजी उपसरपंच, भारती समाधान कटेकर, उज्ज्वला सुनील ठाकुर,रंजना मेघनाथ ठाकुर, प्रणाली प्रविण घरत यांच्या हस्ते कला क्रीडा, संगीत, सांस्कृतिक धार्मिक, सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता, राजकीय आदी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र शाल पुषगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी नीता पाटील, ज्योती पाटील, प्रियंका पाटील, मीनाक्षी पाटील, कांचना पाटील, संगीता पाटील, कल्पना पाटील, कविता पाटील, अक्षता पाटील, नंदिनी पाटील, सुवर्णा रमेश ठाकूर, श्रीमती वंदना वसंत ठाकुर आशा वर्कर धुतूम, रूपाली गणेश पाटील, बचतगट अध्यक्षा विंधणे या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात व त्या नंतर सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या कोप्रोली आरोग्य केंद्रातील ललिता शांतीलाल बकले (ANM -HQ), निर्मला नरेश म्हात्रे (आशा), वैशाली संदीप म्हात्रे (आशा), चैताली अरुण म्हात्रे (आशा), कविता रवींद्र पाटील (आशा), कविता रतन कुंभार (आशा) यांचाही सत्कार, सन्मान करण्यात आला. उरण तालुक्यातील विविध आदिवासी वाडी वरील आदिवासी महिलांचा देखील विशेष सत्कार, सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने समाजातील सर्वच समाज घटकांना नेहमी न्याय दिला आहे. फुले शाहू आंबेडकरवादी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महिलांचा नेहमीच यथोचित मानसन्मान केला आहे.महिलांच्या समस्यांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरू असल्याने या नवरात्रौत्सव मध्ये सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. देवीच्या रूपांची सर्वत्र पूजा अर्चा केली जाते. स्त्रीलाही देवी म्हणून पूजनाची भारतीय परंपरा आहे या भारतीय परंपरा संस्कृतीची जपणूक करून महिलांचा मानसन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने उरण तालुक्यातही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. उरण तालुक्यातून एकूण ६२ महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रवीण राम ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, उरण तालुका महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर यांच्यासह पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार उरण तालुक्यातील नवदुर्गाचं सत्कार सन्मान करण्यात आला असून उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांना गौरविण्यात आल्याची माहिती कुंदा ठाकूर यांनी दिली.चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने विविध सामाजिक संस्था संघटना, नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment