Wednesday, 1 October 2025

विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे विजय भोईर व विकास भोईर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून उरण मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, महाराष्ट्र लेवल किक बॉक्सिंग स्पर्धा, कोरोना काळातील विशेष कामगिरी केलेल्या गुणवंत डॉक्टर यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ९३० मुलांनी सहभाग नोंदवला.एकलव्य अकॅडमीचे राम चौहान, रुद्रांश करिअर अकॅडमीची कुमारी गुंजन निषाद, श्री समर्थ स्पोर्ट्स करिअर अकॅडमीचे समाधान कणेकर,सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे महेश पाटील, व्ही व्ही एस एस अकॅडमीचे सोनल तांडेल, अजय तांडेल, सिव्हिल डिफेन्सचे हरेश्वर ठाकूर व इतर सर्वांनी अतिशय मेहनत घेतली त्यामुळे ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे जिल्हा परिषद रायगड जसखार केंद्र अंतर्गत पहिले ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण ७९० मुलांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक शाळेवरती स्पर्धेचे आयोजन करून निकाल नवघर शाळेमध्ये देण्यात आले. पहिली ते चौथी इयत्ता मधील प्रथम, द्वितीय, तृतीय व पाचवी ते सातवी पर्यंत प्रथम द्वितीय तृतीय अशी बक्षीस देण्यात आली. जसखार अंतर्गत शाळेमधील शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा पूर्ण केली. त्यामध्ये प्रामुख्याने विकास पाटील व त्यांच्या सहकारी यांनी अतिशय मेहनत घेतली. विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्र स्टेट लेवल किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्टोर्म फिटनेसचे सर्वेसर्वा सिद्धेश शिंदे  व सत्या किक बॉक्सिंग अकॅडमीचे सत्या सर यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन केले गेले त्यामध्ये एकूण २३० मुलांनी सहभाग नोंदविला. अतिशय उत्तम रित्या सुंदर असे स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. किक बॉक्सिंग चा थरार उरण तालुक्याला बघण्यास मिळाला.किक बॉक्सिंग स्पर्धेत स्वरा भोईर, साई भोईर यांच्यासह विविध विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. या स्पर्धेत १९ गोल्ड मेडल, ८ सिल्वर मेडल, ५ ब्रॉन्झ मेडल विद्यार्थ्यांनी पटकाविले.कोरोना काळा पासून ते आत्तापर्यंत अतिशय मेहनत घेऊन गोर गरिबांचे सामांन्याचे जीव वाचवणारे डॉक्टर्स यांचा सत्कार विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आला. डॉ विशाल गावंड, डॉ वीर, डॉ पारस ठाकूर, डॉ.सत्या ठाकरे, डॉ. महेश गोसावी, डॉ माधवी गोसावी, डॉ राहुल साठे, डॉ कीर्ती ठाकूर, डॉ विद्या पाटील, डॉ पीयल भगत, डॉ व्यंकटेश गिरी, डॉ मेघा गिरी, डॉ भालचंद्र नाखवा आदी डॉक्टर वर्गांचा सत्कार करण्यात आला. स्टोर्म फिटनेस क्लब उरण, उरण तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळ नवघर, मॉर्निंग वॉक ग्रुप जेएनपीटी आदींचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.एकंदरीत विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 

या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद रवी भोईर, युवा नेते प्रतिम म्हात्रे, उरण शहर ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल अध्यक्ष धनेश गावंड, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, द्रोणागिरी नोड भाजपा अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी विजय भोईर व विकास भोईर यांना त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...