Friday, 10 October 2025

कुणाल पाटील, अमित पाटील यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप !!

कुणाल पाटील, अमित पाटील यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप !!

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ पागोटेची स्थापना १९८८ साली झाली असून या मंडळातर्फे उरण तालुक्यातील पागोटे गावातील श्री दुर्गा देवी मंदिर येथे गेली ३७ वर्षे नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे यंदाचे नवरात्रौत्सवचे हे ३८ वे वर्षे आहे तसेच ४/१०/२०२५ रोजी दुर्गादेवी मंदिराचा १९ वे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाविक भक्तांच्या हाकेला धावून जाणारे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. गावातीलच नव्हे तर इतर गावातील भाविक भक्त सुद्धा देवदर्शनासाठी पागोटे गावात येतात सासरी गेलेल्या महिला वर्ग नवरात्र उत्सव मध्ये आपल्या माहेरी म्हणजेच पागोटे गावात येऊन देवीचे दर्शन घेतात.दरवर्षी मंडळातर्फे भजन कीर्तन हरिपाठ, मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची आदी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे महिलाप्रमाणे पुरुषांचेही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. पुरुषांसाठीही वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. संपूर्ण गावाची गावदेवी म्हणून दुर्गा माता परिचित आहे. नवरात्रीत नऊ दिवस भावीक भक्त दंग असतात.१९ वर्षांपूर्वी या मंदिराचे जीर्णोद्धारसाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उद्योजक जे एम म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले होते. इतर मान्यवरांनीही दिलेल्या देणगीमधूनही या मंदिराचे जीर्णोद्धार झाले होते. नुकताच या मंदिराचा वर्धापन दिनी पागोटे गावचे विद्यमान सरपंच अरुण कुणाल पाटील व त्यांचे भाऊ अमित अरुण पाटील यांच्या तर्फे संपूर्ण गावकीला व गावाबाहेर राहणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.अन्नदान सर्वश्रेष्ठ दान अशी म्हण आहे.गोरगरीब जनतेला आईचा आशीर्वाद महाप्रसादच्या रूपात लाभावा, देवीचा आशीर्वाद सर्वांना मिळावा, महाप्रसाद सर्वांच्या मुखात जावे या दृष्टीकोणातून कोणताही स्वार्थ न बाळगता सरपंच कुणाल अरुण पाटील व त्यांचे भाऊ अमित अरुण पाटील यांनी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप केले. दरवर्षी पागोटे गावात संपूर्ण नवरात्रौत्सव व मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरे होतात. या काळात सर्वच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ पागोटेचे सभासद भारत पाटील, सुरज पाटील, विनोद पाटील, रमेश पाटील, मनोहर पाटील, सदानंद पाटील, सविता पाटील, चंद्रकला पाटील, दिनेश पाटील, विनय भोईर, निशांत पाटील, वासंती पाटील, प्रभावती पाटील व मंडळाचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ मेहनत घेत असतात.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...