मुरबाड मध्ये शिंदे सेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक संपन्न !!
**14 /10 /2025 रोजी होणाऱ्या मेळाव्या संदर्भात केली पाहणी
मुरबाड, (मंगल डोंगरे) : शिवसेना युवा नेते, उत्कृष्ट ससंदपटू, लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब. शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यातील मंगळवार दिनांक 14/10/25 रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या शिवसेना मेळावा यशस्वी रित्या पार पडण्यासाठी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी तातडी ची बैठक घेऊन दिनांक 8/10/25रोजी सायंकाळी चार वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पदाधिकारी आणि महिला आघाडी युवासैनिक यांनी गावागावात बैठक घेऊन मुरबाड येथील वातावरण भगवेमय करून मुरबाड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर भगवा फडकविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन मुरबाड शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आहे. शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी असे आवाहन केले तसेच मेळावा चे ठिकाणी जाऊन पाहणी करून सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे. उप जिल्हा प्रमुख संजय भानुशाली सुदाम पाटील. तालुका प्रमुख कांतिलाल कठे. कल्पेश धुमाळ. संतोष जाधव. रामभाऊ दुधाले. अक्षय रोटे, विनोद नार्वेकर नम्रताताई तेलवणे. नरेंद्र देशमुख. देवयानी दळवी शिंदे ताई.अप्पा यशवंतराव. रामभाऊ सासे. भरत गायकर. दळवी साहेब. युवासेना पदाधिकारी साईनाथ भोईर. आकाश बिराडे. साई तेलवने मुरबाडचे नगरसेवक .शिवसेना पदाधिकारी. युवासेना पदाधिकारी आणि महिला आघाडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment