साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधाील उपोषणाचा सहावा दिवस !
कल्याण, दि. ०९ - कल्याण तहसीलदार अंतर्गत साझा कुंदे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड यांच्या कर्तव्यात असलेले कोलिंब ह्या ठिकाणची फेरफार संचिका ३०२ यांची याची माहिती दडवली याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज दिनांक २९/०९/२०२५ पासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत कायदेशीर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषण करते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे.
उपोषणासंदर्भात तहसिलदार (कल्याण) हे पत्रकारांना माहिती देण्यात टाळाटाळ करीत आहेत, यावर प्रकाश पवार यांनी आता ग्राम महसूल अधिकारी (सांझा कुंदे, कल्याण) यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या वर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment