टिटवाळा, संदीप शेंडगे : भाजपला जोरदार धक्का — माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश !!
टिटवाळा आणि आसपासच्या राजकीय वर्तुळात मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.
सध्या टिटवाळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भाऊबंदकी दिल जमाई होत असून आगामी निवडणुकीत नवी समय करणे तयार होत आहेत टिटवाळ्यामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक नगरसेवक असून त्याचीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला साथ मिळणार असल्याने सर्वात मजबूत पॅनल म्हणून पॅनल नंबर तीन कडे पाहिले जाते. किशोर भाई शुक्ला यांची राजकीय खेळी सर्वांनाच परिचित आहे त्यामुळे आगामी काळात या पॅनलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सरशी पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
त्यामुळे भाजपच्या पॅनल क्रमांक तीनमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.
भाजपमध्ये 'इनकमिंग'मुळे नाराजी शिगेला
भाजपमध्ये कोणतीही पडताळणी किंवा चर्चा न करता नव्या चेहऱ्यांना दिला जाणारा प्रवेश आणि जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा होती.
या पार्श्वभूमीवरच सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून कळते.
“५० वर्षे पक्षासाठी काम केले पण… ” — सुरेश भोईर यांची खंत प्रवेशावेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या.
भावनिक होऊन सुरेश भाऊ म्हणाले “राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आम्ही पक्षासाठी काम केले. टिटवाळ्यात भाजपचा पाया तयार करण्यापासून ते उपमहापौर पदापर्यंतची वाटचाल केली. पालिकेच्या अप्रभाक्षेत्रात कुठेही नगरसेवक नसताना आम्ही टिटवाळ्यातून नगरसेवक उपमहापौर पद मिळविले. पन्नास वर्षे पक्षाची निष्ठेने सेवा केली. पण आज जुन्या, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य स्थान दिले जात नाही. त्यामुळे पक्ष सोडताना वाईट वाटत असले तरी आज घेतलेला निर्णय योग्यच आहे.”
त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
किशोरभाई शुक्ला यांची रणनीती — पॅनल ३ मध्ये समीकरणे बदलणार
या प्रवेशामुळे पॅनल क्रमांक तीनमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. या प्रवेशाचे नियोजन आणि समन्वय किशोर भाई शुक्ला यांनी केल्याचे समजते. त्यांचा शांत संयमी स्वभाव अनेकांना भावून जातो आकर्षित करतो. त्यामुळेच किशोर भाई शुक्ला आगामी निवडणुकीमध्ये टिटवाळा मध्ये गेम चेंज ठरू शकतात.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते “हा प्रवेश म्हणजे पॅनल क्रमांक तीनच्या विजयाचा पाया आणि हा निर्णय आगामी नगरपालिका निवडणुकांमध्य भाजप विरोधी लाट निर्माण होऊन निष्ठावंत त्यांना डावलण्याचा परिणाम निर्णायक ठरणार आहे.”
शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या प्रवेशाचे स्वागत केले असून, “टिटवाळ्यात आता खरी शिवसेना मजबूत होत आहे,” असा दावा करण्यात आला.
एकूणच या प्रवेशामुळे टिटवाळ्यात भाजपला धक्का तर शिवसेनेला मोठा राजकीय फायदा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा नक्कीच मोठा परिणाम दिसून येणार आहे.
No comments:
Post a Comment