Saturday, 22 November 2025

*नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित प्राथमिक प्रशिक्षणाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न* !!!

*नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित प्राथमिक प्रशिक्षणाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न* !!!

     *कल्याण जिल्हा ठाणे प्रतिनिधी (२२ नोव्हेंबर २०२५) : नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार दिनांक १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.*

     *दोन ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन -*

     *या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नागरी संरक्षणाने एकाच दिवशी दोन स्वतंत्र ठिकाणी प्रशिक्षणांचे आयोजन केले होते.*—
     *रायते विभाग विद्यालय व ज्युनियर कॉलेज, रायते-गोविली व नागरी संरक्षण प्रशिक्षण हाॅल, कल्याण कार्यालय, जिल्हा ठाणे.*

     *रायते येथे प्राथमिक पाठ्यक्रम क्र. २४/२०२५ राबवण्यात आला. येथे एकूण ३० सामान्य नागरिक व ज्युनिअर महाविद्यालयीन विद्याक्षर्थ्यांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक उपचार, बचाव कार्य, अग्निसुरक्षा, तसेच विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके देण्यात आली.*

     *कल्याण येथील कार्यालयात पाठ्यक्रम पाठ्यक्रम क्रमांक २३/२०२५, मध्ये २६ प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या.*

     *सांगता समारंभ व शपथविधी.*
     *दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी, पाचव्या व अंतिम दिवशी दोन्ही प्रशिक्षण केंद्रांवर सांगता समारंभ संपन्न झाला. या वेळी मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव सर हे विशेषतः उपस्थित होते. त्यांनी नवीन स्वंयसेवकांना नागरी संरक्षण सभासदत्वाची शपथ देत समाजसेवा, उत्तरदायित्व आणि आपत्तीतील तत्परतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणार्थ्यांना नागरी संरक्षण दलाची भूमिका प्रत्यक्ष समजून घेण्यास मोठी मदत झाली.*

     *मान्यवरांची उपस्थिती.*

     *रायते-गोविली येथे आयोजित समारंभास खालील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली : श्री.पी.एस.शिंदे, मुख्याध्यापक, रायते विभाग, हायस्कूल, सौ. माया शिरोशी, ग्रामपंचायत सदस्य श्री. कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेञ-३, श्री. आनंदसिंग गढरी, सहाय्यक उपनियंत्रक, श्री. रामबरन यादव, विभागीय क्षेत्ररक्षक, टिटवाळा विभाग यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनात  सहकार्य केले तर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.*

     *प्रशिक्षणातील प्रत्यक्ष अनुभव.*

      *पाच दिवस चाललेल्या प्रशिक्षणात विविध प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नागरी संरक्षण दलाची जबाबदारी जाणून घेतली. बर्‍याच प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कु.देवकर यांनी उत्कृष्ट सुञसंचालन केल्याने उपनियंञक, ना.सं.नवीमुंबई समुह, ठाणे यांनी समाधान व्यक्त केले.*

     *कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करुन समारंभानंतर प्रशिक्षणाची निवडक छायाचित्रे माननीय अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आली.*

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...