सामाजिक बांधिलकीचा आदर्श: डॉ. निवृत्ती मगर यांनी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात साजरा केला वाढदिवस !!
ठाणे प्रतिनिधी, (मिलिंद जाधव)
भिवंडी तालुक्यातील मुंबई – नाशिक महामार्गालगत असलेल्या डोहोळे येथील सामाजिक कार्यकर्ते, शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिजाऊ संस्थेचे सदस्य डॉ. निवृत्ती मगर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस सेवाकार्यातून साजरा केला. यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात पडघा परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. गरीब आणि वंचित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित या सेवाकार्याचे नागरिकांनी स्वागत केले.
डॉ. निवृत्ती मगर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक, व्यावसायिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. “जगात सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवधर्म,” या भावनेतून डॉ. मगर समाजातील गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून सतत सेवा करण्याचा संकल्प जपत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment