Friday, 21 November 2025

सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची होणार भरती !!

सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची होणार भरती !!

ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद असून ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे माध्यमातून होणार आहे. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईनच करावेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज २६ नोव्हेंबर २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत स्विकारले जातील.

या भरतीबाबत सविस्तर माहिती व अटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...