संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभाग अप्पर आयुक्तांचा डोहोळे ग्रामपंचायतीला दौरा !!
ग्रामपंचायतीची मुद्देनिहाय तपासणी, विविध योजनांची पाहणी आणि नागरिकांच्या समस्या जाणून मार्गदर्शन
ठाणे प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता स्वच्छता अभियान २०२४-२५ अंतर्गत विभागस्तरीय तपासणीसाठी कोकण विभागाचे अप्पर आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे यांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रुप ग्रामपंचायत डोहोळे येथे भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या आगमनानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनावणे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती दिली. दौर्यात त्यांनी ग्रामपंचायतीतील विविध सुविधांची आणि उपक्रमांची मुद्देनिहाय तपासणी केली. कार्यालय परिसर, डेमो हाऊस, बायोगॅस युनिट यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी, शाळा, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जनमन योजना या योजनांअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल कामांची पाहणी केली.
या भेटीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे कामकाज तपासून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, आशा कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुदाम इंगळे, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, जिल्हा स्वच्छ भारत मिशन कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच सुमन वाघे, उपसरपंच सचिन घोडविंदे, वरिष्ठ लिपिक एकनाथ जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment