निवडणूक संदर्भात कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांचे कोसले ग्रामस्थांना मार्गदर्शन !!
ठाणे प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात कल्याण तालुक्यातील खडवली गट व बेहरे गणामध्ये कोसले गावामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस पाटील विलास पाटील, सरपंच दिलीप पालवी यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण ग्रामीणचे टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शन खाली सभा पार पडली. या सभेमध्ये गावातील ग्रामस्थांचा व नवतरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभागी होते. निवडणूक दरम्यान गावांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राखून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी व ग्रामस्थांनी काळजी घेतली पाहिजे असे पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांनी ग्रामस्थांना आव्हान केले.
या सभेमध्ये गावातील नव तरुणांबरोबर ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षांचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, तंटामुक्त अध्यक्ष ह. भ. प. विलास महाराज पालवी, शेतीनिष्ठ शेतकरी ग्रीन डायमंड कंपनीचे अध्यक्ष श्रीराम पालवी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वयोवृद्ध नागरिक उपस्थित होते. नवतरुण मतदारांचे पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांच्या हस्ते कौतुक व जबाबदारी समजावून सांगून त्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव भोईर यांनी केले.
शेवटी - ( निवडणुकीमध्ये नवतरुणाचा सहभाग पाहता व घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी निवडणुकीपूर्वी प्रत्येक गावामध्ये मार्गदर्शन द्वारे कायदा सुव्यसुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे. )
No comments:
Post a Comment