मुरबाडच्या ‘इन दि सर्च ऑफ…’ नाटकाचा ६४ व्या राज्य हौशी स्पर्धेत यशस्वी प्रयोग !!
कल्याण { प्रतिनिधी } : गेल्या आठवडा भारापासून कल्याण येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा कल्याण केंद्रात सुरू आहे. त्यात दरवर्षी सहभागी असणारी गर्जा प्रतिष्ठान मुरबाड हि संस्था यंदाही सहभागी झाली होती. त्या संस्थेच्या वतीने यावेळी ही गर्जा प्रतिष्ठान मुरबाड निर्मित आणि लेखक नितेश डोंगरे लिखित-दिग्दर्शित “इन दि सर्च ऑफ…” या नाटकाचा प्रयोग ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे उत्स्फूर्त प्रतिसादात सादर करण्यात आला.
**माणसाने देव शोधण्यासाठी मंदिरात धाव घेण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावायला हवे असा चिंतनपर संदेश देत आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती करत असताना माणूस मात्र मानवी मूल्यांपासून दूर जाताना दिसतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद या षड्रिपूंनी ग्रासलेल्या मानवी मनाला पुन्हा माणुसकीची जाणीव करून देणारी ही कथा हरिपूर या छोट्याशा गावातून उलगडत जाते.
**या नाटकात एकूण २२ कलाकारांनी तब्बल ३६ भूमिका साकारल्या. यात धोंडू हवालदार – अजिंक्य डोंगरे, सावळ्या – नितेश डोंगरे, रखमा – सुप्रिया गायकवाड, देवकीनंदन / विठ्ठल / पोलीस अधिकारी – प्रथमेश रोठे, यांच्या भूमिका विशेष उठून दिसल्या. तसेच भड्क्या (संतोष भांडे), घशात्या (विनय गायकर), भुलवा (सानिका भोईर), झगमग्या (भूषण मिरकुटे), वासू (प्रदीप देसले), फुशारक्या (निशांत कडू) यांसह संपूर्ण गर्जा टीमने नाटकाला योग्य रंगत प्राप्त करून दिली. तांत्रिक बाजू सांभाळताना संगीत – महेश वाळकोळी, सचिन कालेकर, देवेश कराले, नेपथ्य – वैभव खाटेघरे, प्रकाशयोजना – जयेश माळी, रंगभूषा व वेशभूषा – वैजयंता भांडे यांनी नाट्य सादरीकरणाशी अभिजात एकरूपता साधली. निर्मिती प्रमुख म्हणून कुणाल घोलप, गणेश शिंगोळे, भूषण मोरे, तर रंगमंच व्यवस्थापनात विकास गोंधळी, हरेश दळवी, संदीप खरे, रोशन देसले यांनी योगदान दिले.
नितेश डोंगरे यांची ही नववी नाट्यकृती असून ग्रामीण भागातील नाट्यपरंपरा जपत मुरबाडचे नाव त्यांनी राज्यभर गाजविले आहे. एकूणच, ‘इन दि सर्च ऑफ…’ हे नाटक देव, माणूस, श्रद्धा, माणुसकी आणि आत्मशोध यांच्यातील नात्याचा खोलवर शोध घेते. तेही विनोदाच्या अंगाने, मनाला प्रश्न पडतो “देव कुठे शोधायचा?” आणि या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षक स्वतःकडेच शोधू लागतात. समाजाला नवी दिशा देणाऱ्या या नाटकासाठी लेखक-दिग्दर्शक नितेश मंगल डोंगरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वच नाट्यरसिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment