Friday, 28 November 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचा उल्लेखनीय निकाल – मान्यवरांकडून गौरव !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचा उल्लेखनीय निकाल – मान्यवरांकडून गौरव !!

मुंबई प्रतिनिधी: ता. २८
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग चेंबूर (पूर्व) तसेच एल-वार्ड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा समूह यांच्या विद्यमाने आयोजित सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार व एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२५ मधील ९० ते १०० टक्के निकाल प्राप्त शाळांचा सन्मान सोहळा दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अल बरकत इंग्लिश स्कूल, कुर्ला (प.) येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला शिक्षण निरीक्षक मा. डॉ. मुस्ताक शेख, शिक्षण उपनिरीक्षक श्रीमती गोरे मॅडम, श्री खाडे सर, श्री कंठे सर, सहा. कार्यक्रम अधिकारी श्री दीपक दिनकर सर, CRC श्री राठोड सर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमात यावर्षी निवृत्ती प्राप्त मुख्याध्यापकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १०० टक्के निकाल पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

एल-वार्ड विभागातील दोन रात्र शाळांपैकी सतत उल्लेखनीय निकाल देणाऱ्या रात्र शाळांमध्ये अग्रस्थान संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिमचे आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित ही रात्र शाळा मागील पाच वर्षांपासून सलग उत्तम निकाल देत आहे. मार्च २०२५ मध्ये शाळेचा निकाल ८७.५% लागल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.

उत्कृष्ट निकालामुळे अनेक विद्यार्थी आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्र शाळेत प्रवेश घेत आहेत. शाळेला ‘मासूम’ संस्थेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन तसेच एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.

मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत म्हणाले -
“रात्र शाळेचा सातत्यपूर्ण चांगला निकाल, संस्थेचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे,” असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...