कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा लढणार !!
दि : २७ नोव्हेंबर २०२५ रोजी आम आदमी पार्टी डोंबिवली चे निवडणूक कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे प्रदेश सचिव डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यालय वाशी बस स्टॉप समोर, डोंबिवली (प ) येथे आहे .
सदर उदघाटन सोहोळ्या दरम्यान राज्याचे प्रदेश सचिव डॉ मोरे यांनी येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एखादा पक्षाचे हे पाहिले नवडणूक कार्यालय आहे .
आम आदमी पक्ष सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उम्मेदवार देऊन कल्याण डोंबिवली ला दिल्ली आणि पंजाब सरकार प्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य,चांगले रस्ते अश्या मूलभूत मुद्द्यांवर निवडणूक लादणार असल्याचे पक्षाचे मुख्य निवडणूक सल्लागार ऍड आकाश वेदक यांनी सांगितले .
आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला विचारून आपला जाहीरनामा बनवणार असे पक्षाचे कल्याण डोंबिवली महिला आघाडी अध्यक्षा सौ रेखा रेडकर यांनी या दरम्यान जाहीर केले .
कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी पक्षात गेले आहेत, जनता आता नवीन विकल्प च्या शोधात आहे, तरी येणार निवडणुकीत मतदाता आम आदमी पार्टी नक्की यश देईल असे पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष ऍड धनंजय जोगदंड यांनी सांगितले .
सदर सोहळ्या दरम्यान आम आदमी पक्ष चे राज्य सचिव डॉ अभिजित मोरे, प्रदेश सह सचिव अमोल मोरे, प्रदेश महिला संघटक सौ नीलम व्यवहारे, कल्याण जिल्हा अध्यक्ष ऍड धनंजय जोगदंड, कल्याण जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ रेखा रेडकर, मुख्य निवडणूक सल्लागार ऍड आकाश वेदक राज्य सोसिअल मीडिया टीम चे निलेश व्यवहारे, निवडणूक समिती चे अजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .
ऍड आकाश वेदक
९९३००१३९२६
No comments:
Post a Comment