उच्च न्यायालय मुंबई रेकॉर्ड डिपार्टमेंट अपील शाखा येथे कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला फायलर उषा (दीदी) नेसवणकर सेवानिवृत्त !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
उच्च न्यायालय मुंबई रेकॉर्ड डिपार्टमेंट अपील शाखा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला फायलर उषा (दीदी) नेसवणकर या दि. २३ जानेवारी १९८६ रोजी शिपाई म्हणून उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी रुजू झाल्या व दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी फायलर या पदावरून नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी नाझर कॅश डिपार्टमेंट या ठिकाणी वीस वर्ष नोकरी केली.त्यानंतर त्यांची फायलर या पदावर पदोन्नती झाल्यानंतर रेकॉर्डिंग डिपार्टमेंट आल्या.त्यानी १८ वर्ष रेकॉर्ड डिपार्टमेंटला प्रामाणिकपणे काम केले. त्यानी एकूण ३८ वर्ष नोकरी केली.त्यांना कधी रजा घेणे म्हणजे जीवा पलीकडे वाटायचे त्या कधी आजारी पडल्या असे कधीच वाटत नसायच्या.त्या महिला असून देखील दहा ते बारा फुटाच्या रॅग वर चढून गठ्ठ्यामधील खटले काढत असायच्या. तसेच त्या आपल्या कार्यालयातील सहकार्यांबरोबर घडून मिळून हसत - खेळत काम करत असायच्या. उषा दिदि दि. ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांचे पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रबंधक स्मिता घोणे मॅडम, सहाय्यक कक्ष अधिकारी जितेंद्र वारेशी, सौ.रूपाली बागुल, रवींद्र परब, यशवंत आंबेकर, समाजसेवक चंद्रकांत करंबळे, संजय पालव, गणी पटेल, लुईस अल्मेडा, जगदीश पाटील, हेड बायंडर रमेश परदेशी व सर्व फायलर, बायंडर, बॉय बायंडर, प्रवीण राणे, पूजा राणे, प्रताप यरम, प्रियंका यरम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment