Tuesday, 4 November 2025

उल्हासनगर - ४ येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा रंग निघत असल्याने अँड प्रशांत चंदनशिव यांनी महापालिका बांधकाम विभागाला निवेदन !!

उल्हासनगर - ४ येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा रंग निघत असल्याने अँड प्रशांत चंदनशिव यांनी महापालिका बांधकाम विभागाला निवेदन !!

उल्हासनगर, दि. ४, प्रतिनिधी : उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रभाग समिती ४ मधील सुभाष टेकडी परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवला गेला आहे. पूर्णाकृती पुतळ्याचा रंग चॉकलेटी होता परंतु अनावरण करण्याच्या घाई मध्ये पुतळ्याच्या काही ठिकाणी रंग गेला होता तसेच त्यात काही काम ही बाकी असताना ते काम पूर्ण न करता पुतळ्याचा रंग पूर्ण बदला गेला, अधिकारी वर्गाला ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सदर गोष्टी कळविण्यात आल्या होत्या. त्यांना सांगण्यात ही आले की पाऊस आल्यानंतर रंग निघून जाईल परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले गेले.

           
सदर विषयाकडे स्वतः लक्ष घालावे तसेच ठेकेदार याचा वर कारवाई करावीच व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती ची पुन्हा पाहणी करून ज्या ठिकाणी रंग निघत आहे त्याठिकाणी ती दुरुस्ती करून रंग लाऊन घ्यावा.असे तक्रारी अर्ज ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले उप अभियंता संदीप जाधव यांनी त्वरीत पाहणी करण्यास आदेश देण्यात आले आहे.

तरी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणी आदेश दिल्या नंतर आज त्यांनी पाहणी केली गेले असून सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सुशांत, कपिल यांनी पाहणी केली सदर ठिकाणी ॲड प्रशांत चंदनशिव, अभिजीत चंदनशिव, शेखर दळवी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...