युईएस उरण शाळेला आदर्श शाळा पुरस्कार !!
उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आज वर चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड ही संस्था विकास कडू संस्थापक -अध्यक्ष ह्याच्या नेतृत्वा खाली ९ वर्ष समाज सेवेचे उपक्रम राबवत आहे.आज आदर्श शाळा तालुका हा उपक्रम हाती घेऊन रायगड जिल्हातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा निवडत आहे त्या प्रमाणे उरण मधून उरण एज्युकेशन सोसायटी (UES) ह्या शाळेला उरण तालुका आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.सदर पुरस्कार आवाज महामुंबईचा न्यूज चैनलचे संपादक मिलिंद खारपाटील (सल्लागार) यांच्या शुभ हस्ते यु ई एस चे मानद सचिव ऍड. राजेंद्र भानुशाली व यूईएस प्राचार्य सिमरण दहिया यांनी स्वीकारले. तेव्हा भावना व्यक्त करताना राजेंद्र भानुशाली म्हणाले की "आत्ता उरण तालुक्यातून आमच्या शाळेला आदर्श शाळा उरण म्हणून पुरस्कार मिळाला त्या बद्दल मी चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे आभारी आहोत आणी या पुढे यूईएस ची जबाबदारी वाढेल व शाळेतील मुलांसाठी आणखी काही जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्या गोष्टीवर भर देण्यात येईल" तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विठ्ठल ममताबादे (मीडिया सल्लगार), ऍड. विजेंद्र पाटील (कायदेशीर सल्लागार), अभिनेते चेतन दादा पाटील (संस्कृतीक विभाग रायगड प्रमुख) यांची उपस्थिती होती.
तर युईएस शाळेतर्फे समन्वयक मितेश पुरारकार, पर्यवेक्षिका सोनाली म्हात्रे, पर्यवेक्षिका श्रीमती योगिता चौधरी, पर्यवेक्षिका कु नैना सिंग, पर्यवेक्षिका रेश्मा वैदय, पत्रकार दिनेश पवार, पालकप्रतिनिधी अनुश्री पाटील, सरिता गुप्ता उपस्थितीत होते. तर संस्थे तर्फे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू, कार्याध्यक्ष मनोज ठाकूर, कोषाध्यक्ष रोशन घरत, सदस्य रोशन धुमाळ, कु अभिषेक माळी, कु विवेक कडू हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास कडू यांनी केले ते बोलताना म्हणाले "युईएस ही एक शाळा नसून एक कुटूंब आहे, कारण शाळेत मुलांच्या शिक्षणाची खूप चांगल्या प्रमाणात काळजी घेतली जाते विशेषता सुरक्षा च्या बाबतीत २१३ सीसीटीव्ही कॅमेरे, मुलांना सुसज्य सायन्स लॅब, नीट नेटके ग्रंथलंय या सारख्या अनेक सोयी आहेत. आज २५ वर्ष या शाळेला कुठलाही गालबोट लागलेला नाही म्हणून उरण तालुक्यातील प्रत्येक पालकाला आपली मुले युईएस या शाळेत शिकवायची असे वाटते म्हणूनच आमच्या संस्थे ने युईएस या शाळेला आदर्श शाळा उरण हा पुरस्कार देण्याचे ठरवले" तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य सिमरण दहिया यांनी मानताना म्हणाल्या की "मी युईएस शाळाचा एक भाग आहे हे माझे भाग्य समजतो आज चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड कडून युईएस शाळेला आदर्श शाळा उरण हा पुरस्कार दिल्या बद्दल युईएस शाळेतर्फे चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे आभार व्यक्त करतो " या कार्यक्रमा प्रसंगी महामुंबईचे संपादक मिलिंद खारपाटील यांनी युईएस शाळेला २० पुस्तके ग्रंथलयात भेट म्हणून दिली.
No comments:
Post a Comment