Sunday, 9 November 2025

उच्च शिक्षित जगदीश ठाकुर यांची शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती‌ !!

उच्च शिक्षित जगदीश ठाकुर यांची शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती‌ !!

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, तसेच संसद महारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी जगदीश ठाकुर यांची शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. उच्च शिक्षीत, अभ्यासू , हुशार, संयमी, कार्यकुशल, सर्वांच्या हाकेला धावुन जाणारे, सर्वांना सोबत घेवुन चालणारे व्यक्तिमत्व असून ते मुर्बी गाव कमीटी तथा संत रोहिदास चर्मकार संघटनेचे अध्यक्ष असून आपल्या कार्यकौशल्य, नेतृत्वगुण आणि समाजसेवेच्या वृत्तीमुळे मिळालेली ही निवड खरंच अभिमानास्पद आहे. असे गौरवोदगार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख  झालेली निवड ही अत्यंत आनंददायक आणि गौरवाची बाब आहे. आपण पक्षनिष्ठा, संघटनशक्ती आणि कार्यतत्परतेच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आपल्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य अधिक जोमाने आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित पद्धतीने पुढे जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. असेही मत बारणे यांनी या वेळी व्यक्त केले. या नियुक्ती बद्दल जगदीश ठाकूर यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. जगदीश ठाकूर यांची उप तालुका प्रमुख पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...